उगवली शुक्राची चांदणी…”दे धक्का फेम” ही बालकलाकार आता झाली २४ वर्षांची दिसते खूपच सुंदर

२००८ साली “दे धक्का” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, यासोबत सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य हे बालकलाकार देखील झळकले होते. चित्रपटातील “उगवली शुक्राची चांदणी …” ह्या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय असल्याचे दिसून येते. हे गाणे चित्रित झाले होते “गौरी वैद्य” ह्या बालकलाकारावर. परंतु एक दोन चित्रपट साकारणारी ही गौरी आता या क्षेत्रापासून काहीशी दुरावलेली दिसत आहे.

गौरी ने दे धक्का या चित्रपटानंतर २०१० सालच्या ‘शिक्षणाच्या आईचा घो’ चित्रपटात पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावली होती. भरत जाधव या चित्रपटात तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला तर सक्षम कुलकर्णी हा तिच्या भावाच्याच भूमिकेत पाहायला मिळाला. सक्षम सोबत तिने एका पेक्षा एक जोडीचा मामला २०११ या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. गौरी सध्या अभिनय क्षेत्रापासून दुरावली असलेली दिसते. कारण या मोजक्या चित्रपटाव्यतिरिक्त तिला नंतर कधीच कोणत्या चित्रपटात पाहिले गेले नाही. या मधल्या काळात तिने शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केलेले पाहायला मिळत आहे. डी जी रुपारेल कॉलेज मधून शिक्षण घेतल्यानंतर तिने Watumulla institute इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मधून पदवी मिळवली आहे. यापुढे ती अभिनय क्षेत्रात येईल की नाही माहीत नाही पण एक गुणी कलाकार ग्लॅमरस दुनियेपासून नक्कीच दुरावलेली दिसते असे म्हणायला हरकत नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *