ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांचं लग्न होणार जानेवारीच्या ह्या तारखेला

“तुला पाहते रे” मालिकेतील ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला आता ईशाचे आई आणि बाबा दिघीनीं ही संमती दाखवल्याचे आपलं पहिलेच असेल. चक्क विक्रांत सरंजामे यांच्या आईने सरंजामी यांच्या चाळीतल्या घरी जाणून ईशाचा हात मागितलेला एपिसोड आपण पाहिलाच असेल. नुकतंच ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नाचं शूटिंग झालंय आणि तो भाग आता लवकरच प्रक्षेपीतही होणार आहे. पण ह्या दोघांचं लग्न मालिकेत केंव्हा दाखवलं जाणार असा सवाल अनेक जण सोशिअल मीडियावर विचारताना पाहायला मिळत आहेत.

२०१९ सालच्या जानेवारी महिन्यातील १३ तारखेला रविवारी प्रक्षेपित होणाऱ्या १ तासाच्या विशेष भागात आपल्याला ह्यांच्या लग्नाचा सोहळा झी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ईशाच्या वडिलांना नवे ठेवणारी मंडळी ह्या सोहळ्याचा आनंद लुटताना तसेच ईशाचे आणि विक्रांत सरंजामी यांचे कौतुक करताना पाहायला मिळणार आहेत.
ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नानंतर मालिका कोणते नवीन वळण घेते कि मालिका येथेच पूर्ण विराम घेते याच उत्तर येणाऱ्या काही काळातच पाहायला मिळेल. १३ ऑगस्ट २०१८ साली प्रक्षेपित झालेली हि मालिका अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्राची नंबर ३ ची मालिका बनली आहे. झी वाहिनी वरील “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका प्रथम क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर “तुझ्यात जीव रंगला” हि मालिका आहे. महाराष्ट्रात पहिल्या ५ क्रमांकावरील मालिका ह्या झी वाहिनीच्या असल्याने झी वाहिनीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याचे दिसून येते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *