ईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नाचे फोटो पाहून अवाक व्हाल .

१३ जानेवारी २०१९ रोजी “तुला पाहते रे” मालिकेतील ईशा आणि विक्रांत सरंजामे विवाहबंधनात अडकणार आहेत. दिपविर प्रमाणे मालिकेतील “विकिशा” या मराठमोळ्या जोडीला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. १३ तारखेला रविवारच्या महाविशेष भागात त्यांच्या लग्नाचा सोहळा छोट्या पडद्यावर संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचे चित्रीकरण पुण्यातील भोर परिसरातील “सिनर्जी हॉलिडे व्हिलेज” या ठिकाणी करण्यात आले आहे. हे ठिकाण निवडण्यामागेही विशेष कारण आहे, ते म्हणजे येथील नैसर्गिक सौंदर्य. या ठिकाणचे फोटो पाहूनच तुम्हाला या ठिकाणी एकदा तरी भेट देण्याची ईच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.

सिनर्जी हॉलिडे व्हिलेजचा हा नयनरम्य परिसर पाहताक्षणी मनाला मोहित करून टाकणारा आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण घनदाट हिरवीगार झाडी, डोंगररांगा आणि तलावातील निळेशार पाण्याने निश्चितच आपल्या मनाला भुरळ घालते. पुण्यातील भोर तालुक्यातील “करंदी खुर्द” येथील हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात आपली नवी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. ठिकठिकाणहून अनेक हौशी पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी हजेरी लावतात. राहण्याची, जेवणाची विशेष सुविधा असल्याने हे ठिकाण आता पर्यटकांचे आकर्षण बनताना दिसत आहे. “तुला पाहते रे” या मालिकेने देखील ईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाचे चित्रीकरण याच ठिकाणी केले असल्याने येथील नयनरम्य परिसर मालिकेच्या चाहत्यांना पाहायला मालिकेद्वारे पाहायला मिळणार आहे. या ठिकाणचे हे फोटो तुम्हाला नक्कीच अवडतील. अशा नवनवीन पोस्ट साठी आमच्या पेजला लाईक करून शेअर करायला विसरू नका…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *