इशा आणि विक्रांत “विकिशा” यांच्या लग्नाचे फोटो सर्वप्रथम पाहण्यासाठी

विकिशा अर्थात विक्रांत आणि ईशा यांच्या लग्नाची जय्यद तयारी मालिकेत पाहायला मिळतेय. येत्या २ ते ३ दिवसांत तुम्हाला इशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या साखरपुडा पाहायला मिळेल. लग्नाच्या सोहळ्याचे चित्रीकरण पुण्यातील भोर परिसरातील “सिनर्जी हॉलिडे व्हिलेज” या ठिकाणी करण्यात आले आहे. हा दिमाखदार सोहळा तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. पण येत्या १३ जानेवारीला रविवारी होणाऱ्या विशेष भागात तुम्हाला ह्या दोघांचा विवाह सोहळा हि पाहायला मिळणार आहे.

अत्यंत गरीब घरात वाढलेली ईशा निमकर हि आता मोठ्या घरची सून होणार ह्यामुळे चाळीतील लोक हि खूप अनादी असल्याचे पाहायला मिळतेय. सुरवातीला त्यांनी ईशाच्या बाबाना खूप त्रास दिल्याचे पाहायला मिळाले, पण विक्रांत सरंजामे यांनी लग्नाची मागणी घातली आणि ह्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. त्या पाठोपाठ विक्रांत आणि ईशाच्या लग्नाची महागडी पत्रिका पाहून अक्खी चाल हादरून गेली. चक्क दीड लाखांची पत्रिका आणि त्यासवबत आलेला सोन्याचा गणपती , चांदीचा करंडा, चांदीची पत्रिका, महागडी मिठाई आणि सोन्याचा मुलामा दिलेली फुले मिळाल्याने त्याची तोंडे गप्प आलेली पाहायला मिळाली.
पुढच्या काही भागात टीव्ही चायनलवरही ह्या दोघांच्या लग्नाची वार्ता मीडिया कशी उचलून धरते आणि त्यापासून इशा निमकर आणि विक्रांत सरंजामे ह्या दोघांना आणि त्यांच्या कुटूंबाला कस धारेवर धरतात आणि त्यातून ते कसे सावरतात हे पाहायला मिळणार आहे. अवघ्या ५ महिन्यांत हि मालिका खवघवित यशाने झी वाहिनीचे नंबर ३ ची मालिका बनली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *