“इंदोरीकर महाराज” एवढ्या मिळवलेल्या पैशाचे नेमके करतात काय?…जाणून घेतल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल

ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज विज्ञानाची जोड देत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करतात. प्रचंड विनोदबुद्धी आणि रोखठोकपणा याच कारणामुळे त्यांचे कीर्तन अगदी अबालवृद्धांना आकर्षित केल्याशिवाय राहात नाही. मला आजही आठवते आमच्या गावी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होणार म्हणून आसपासचे गावकरिच नाही तर अगदी तालुका पातळीवरील मंडळी आपल्या पोराबाळांसकट त्यांचे कीर्तन ऐकायला आलेले पहायला मिळाले होते. गावोगावि दर दिवसाला त्यांची एक ते दोन कीर्तन असल्याशिवाय राहत नाही.

त्यामुळे इंदुरीकर महाराज नुसता पैसे छापतो अशीच एक धारा सर्वांच्या मनात बिबवलेली पाहायला मिळते.मग एवढ्या पैशाचे ते नेमके करतात काय ? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.
इंदोरीकर महाराजांनी आपल्या गावी एका टोलेजंग इमारतीत शाळा सुरू केली आहे. जिथे मुलांना पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. फक्त एवढेच नाही तर यासाठी विद्यार्थ्यांकडून ते एकही रुपया स्वीकारत नाहीत. स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांनी या शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले आहे. गरीबातला गरीब विद्यार्थ्यां शिकला पाहिजे यासाठी त्यांनी हे मोलाचे कार्य सुरू केले आहे. अशा या टोलेजंग इमारतीत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा त्यांनी करून दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर एवढ्या मिळलेल्या पैशाचे करतात काय ? याला चोख उत्तरच दिले असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या एका कीर्तनाच्या माध्यमातूनच त्यांनी हा खुलासा केला आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *