इंडियन आर्मी बद्दल तुम्हाला हे माहित असायलाच हवं

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे.भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात.फिल्ड मार्शल हि पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जायचे.स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे आणि प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे , परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे , सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते.भारतीय लष्कराने पाकिस्तान ,चीन यासारख्या शेजारील देशांसोबत केलेल्या युद्धप्रमाणेच ऑपरेशन विजय ,ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमाही आखल्या आहेत.संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहे.भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान ,आधुनिक पद्धती ,आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे.

भारतीय सैन्य रेजिमेंटमध्ये विभागलेले असले तरी त्याचे सात व्यावहारिक आणि भौगोलिक विभाग आहेत. अशा प्रत्येक विभागास कमांड असे नाव दिलेले आहे.


कमांड – भारतीय सैन्यातील सात कमांड चीफ ऑफ स्टाफच्या नेतृत्त्वाखाली असते. हा अधिकारी लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक कमांडमध्ये १-२ कोर असतात. भारतीय सैन्यात सहा लढाऊ कमांड, एक प्रशिक्षण कमांड आणि तीन मिश्र कमांड आहेत.

कोर – प्रत्येक कोरचा कमांडिग ऑफिसर (जीओसी) असतो. हा सहसा लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक कोरमध्ये ३-४ डिव्हिजन असतात.

डिव्हिजन – प्रत्येक डिव्हजिनचा सेनापती जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) असतो. हा सहसा मेजर जनरल पदावरील अधिकारी असतो. एका डिव्हिजनमध्ये ३-४ ब्रिगेड असतात. भारतीय सैन्यात सध्या एकूण ३७ डिव्हिजन आहेत. यांत ४ रॅपिड डिव्हिजन, १८ पायदळी डिव्हिजन, १० डोंगरी डिव्हिजन, ३ चिलखती डिव्हिजन आणि दोन तोफखान्याच्या डिव्हिजनांचा समावेश आहे.

ब्रिगेड – प्रत्येक ब्रिगेडचा नेता ब्रिगेड कमांडर असतो. हा सहसा ब्रिगेडियर किंवा ब्रिगेडियर जनरल पदावर असतो. एका ब्रिगेडमध्ये साधारण ३,००० सैनिक असतात. यात तीन पायदळ बटालियन आणि त्यांच्या कुमकेचा समावेश असतो. भारतीय सैन्यात डिव्हिजनांमधील ब्रिगेडांबरोबरच स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या ५ चिलखती ब्रिगेड, १५ तोफखान्याच्या ब्रिगेड, सात पायदळी ब्रिगेड, १ पॅराशूट ब्रिगेड, ३ हवाई संरक्षण ब्रिगेड, ४ अभियांत्रिकी ब्रिगेडा आणि २ हवाई संरक्षण समूह आहेत. प्रत्येक स्वतंत्र ब्रिगेड आपापल्या कोर कमांडरच्या हुकुमाखाली असते.


बटालियन – प्रत्येक बटालियनचा नायक बटालियन कमांडर असतो. हा सहसा कर्नल पदावर असतो. प्रत्येक बटालियनमध्ये अनेक कंपनी असतात. यांतील एकतरी कंपनीमधील एखादीतरी प्लाटून घातक प्लाटून प्रकारची असते. बटालियन ही भारतीय सैन्याचा मूळ एकक मानला जातो.

कंपनी – कंपनीचा नेता कंपनी कमांडर असतो. हा मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असतो. एका कंपनीमध्ये ३ प्लाटून असतात.प्लाटून – प्लाटून कमांडर प्रत्येक प्लाटूनचा नेता असतो. हा सहसा जुनियर कमिशन्ड ऑफिसर पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक प्लाटूनमध्ये तीन सेक्शन असतात. सेक्शन: प्रत्येक सेक्शनचे नेतृत्त्व हवालदार करतो. हा सहसा नॉन कमिशन्ड ऑफिसर असतो. प्रत्येक सेक्शनमध्ये १० सैनिक असतात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *