आशा भोसले यांच्या कुटुंबाचे हे कधीही न पाहिलेले फोटो

रविवार ८ सप्टेंबर रोजी दुबई येथे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ८६ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या आवाजातील गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आशा भोसले या मंगेशकर कुटुंबातील सदस्या परंतु लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी असलेले गणपतराव भोसले यांच्यासोबत त्यांचे प्रेम जुळून आले. त्यामुळे वडिलांचा साहजिकच या लग्नाला विरोध होता असे असतानाही त्यांनी वयाच्या १६-१७ व्या वर्षीच गणपतरावांसोबत आपला संसार थाटला. त्यांना तीन अपत्ये झाली.

मुलगी वर्षा भोसले, आनंद भोसले आणि हेमंत भोसले( नावात बदल करून हेमंत कुमार याच नावाने ते ओळखले जातात). त्यांचा थोरला मुलगा हेमंत भोसले हे म्युजिक डायरेक्टर म्हणून ओळखतात. ८ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांची ५६ वर्षाची मुलगी वर्षा भोसले हिने गोळी झाडून आत्महत्या केली होती. नैराश्येतून त्यांनी याआधी दोनदा आत्महत्येचे प्रयत्न केले होते. वर्षा चे लग्न क्रीडा पत्रकार हेमंत केंकरे यांच्यासोबत झाले होते परंतु त्यांच्यापासून त्यांनी अगोदरच घटस्फोट घेतला होता. वर्षा भोसले यांनी आशा भोसले यांच्यासोबत काही गाणी गायली होती. “ताला सुरांची गट्टी जमली”, ” चांदोबा चांदोबा भागलास का? ” ही अजरामर गाणी त्यांनीच गायली होती.

तर आशा भोसले यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले दिग्दर्शन क्षेत्रात आहेत. आशा भोसले यांचा नातू आणि आनंद भोसले यांचा मुलगा चैतन्य भोसले हा देखील गायक आहे. ‘अ बँड ऑफ बॉईज’ या पहिल्या बँडचा तो एक सदस्य आहे ज्यात काही खास बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.
गणपतराव भोसले यांचे १९६६ साली वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर १९८० साली आशा भोसले यांनी बॉलिवूड संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांच्यासोबत दुसरे लग्न केले, आर डी बर्मन यांचेही हे दुसरे लग्न होते. ४ जून १९९४ रोजी आर डी बर्मन यांचे हृदय विकाराने निधन झाले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *