रविवारी २१ एप्रिल कोलकाता नाईटराईडर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद यांच्या सामन्यातील लढतीत सनराईजर्स हैद्राबाद हा संघ विजेता ठरला. पण ह्या सामन्यात काही घाणेरडे गालबोटही लागले. सामान्य दरम्यान कॉर्पोरेट बॉक्स मध्ये काही व्यक्ती मुद्दामुन धुमाकूळ घालताना पाहायला मिळाली. त्यात एका साऊथ चित्रपटतील अभिनेत्रींचाही समवेश होता. कॉर्पोरेट बॉक्स मध्ये हि अभिनेत्री दारूच्या नशेत आरडा ओरडा आणि अश्लील चाळे करताना पाहायला मिळाली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तेलगू अभिनत्री प्रशांती हिच्या तिच्या अन्य सहा मित्रांसोबत क्रिकेटचा सामना पाहायला आली होती. सामना पाहताना ह्या सर्वानीच मद्य प्राशन केले होते. हे सर्वजण सामना चालू असताना खूप मोठमोठ्याने आरडा ओरडा करत होते. अनेकांनी शांत बसायला सांगितल्यानंतर ते शांत न बसता धिंगाणा घालत होते उलट त्यांनीच तेथील प्रेक्षकांना धमक्या डायल सुरवात केली.
राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर असलेल्या सीसीटिव्हीमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून व्हिडिओचा आधार घेत संतोष नावाच्या व्यक्तीने तेलगू अभिनत्री प्रशांती ह्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. ह्या व्हिडिओत तेलगू अभिनत्री प्रशांती हि मित्रांसोबत एकमेकांवर उड्या मारताना दिसत आहे. तसेच तिचे मित्र तिला उचलून घेऊन मोठमोठ्याने धिंगाणा घालताना दिसताहेत. संतोषने प्रशांती आणि तिच्या मित्रांच्या विरोधात दिलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई देखील केल्याचे स्पष्ट होताना दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *