आम्ही ह्या चित्रपटाचे फोटो का टाकलेत ? तुमच्यासाठी फार गरजेचं आहे

शाळा, बालक-पालक(BP), टाईमपास, सैराट, फ्यांड्री, आइटमगिरी, बॉइज, यंटम यांसारखे लहानग्यांवर आधारित अनेक चित्रपट मराठी सिनेसृष्टीत खूप गाजले. पण ह्याचा वास्तविक जीवनावर खूप घाणेरडा परिणाम होताना दिसतोय. जी मराठी सिनेसृष्टी आपल्याला मनमुराद हसवणारी, वास्तविक जीवनात उपयोगी पडणारी, आपल्याला नेहमी प्रोत्साहन देणारी ठरते त्याच सिनेजगतात आज अशे चित्रपट चालतात हे नवल.

अत्यंत कमी पैश्यांच्या असे सिनेमे बनतात त्यामुळे कदाचित प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांचा खर्च वाचतो व सिनेमा चालो अथवा न चालो सरकारच्या तिजोरीतून अनुदान मिळते तसेच चित्रपट थोडेफार जरी चालला तरी भरघोस उत्पन्न घेता येते. विशेष असं काहीही नसतानाही सैराट सारख्या चित्रपटाने तर १०० कोटींचा पल्ला गाठला अश्या कारणामुळे असे चित्रपट बनतात आणि त्यात प्रेम कहाण्या, गलिच्छ शब्द, नको ते इशारे करणे असे अनेक प्रकार दाखवले जातात. याचा शालेय मुलांवर फार विपरीत परिणाम होताना दिसतो.

आपण जे दाखवतो मुले-मुली त्याचच अनुकरण करताना पहायला मिळतात. त्यामुळे अश्या चित्रपटांवर सेन्सॉरने काही बंधने घालणे फारच गरजेचे आहे. शेवटी तो चित्रपट आपण पहायचा कि नाही तो आपल्यावर अवलंबून आहे. पण जर मराठी रसिकांनीच अश्या चित्रपटांना गर्दी केली नाही तर उत्तम.

असे अनेक चित्रपट आहेत जे मराठी सिनेमाचा उच्च दर्जा आणि सामाजिक बांधिलकी जपतात विशेष म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने दाखवलेल्या चित्रपटांमुळे दाबले जातात. व्हंटीलेटर, भिकारी, बघतोस काय मुजरा कर, रिंगण, आपला माणूस, नटसम्राट. अशाप्रकारचे सिनेमे ज्यातून खरंच काही घेण्यासारखं आहे. अश्या चित्रपटासाठी मराठी माणसालाच आता पुढे येणे गरजेचे आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *