आपल्याच नियमानुसार वागणारा हा अभिनेता सिने सृष्टीत आहे बदनाम…दुसरे लग्न करून ५० व्या वर्षी बनला बाप

सिंघम चित्रपटातील जयकाल शिकरे या खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली होती. ही भूमिका साकारली आहे दाक्षिणात्य अभिनेता ‘प्रकाश राज’ याने. प्रकाश राज यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम,हिंदी असे अनेक चित्रपट साकारले. परंतु त्यांच्या एका वाईट सवयीमुळे ते या क्षेत्रात बदनाम असल्याचे बोलले जाते. अनेकवेळा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अभिनेता कधीच वेळ पाळत नाही. उलट आपल्याच बनवलेल्या नियमांवर ठाम राहून दिग्दर्शकाला पेचात पडतो. याबाबत त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले तेव्हा त्याने याचे स्पष्टीकरण दिले.

प्रकाश राज म्हणतात, मी रोज रात्री ३ वाजता झोपतो आणि सकाळी ९ वाजता उठतो ही माझी सवयच आहे. ह्याबाबत कोणीही मला माझे आयुष्य बदलण्यास प्रवृत्त करू शकत नाही. कोणासाठीही मी माझे आयुष्य का बदलावे या नियमावर ठाम असल्याने अनेक वेळा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. तुम्हाला माझे नियम पटत असतील तर मी चित्रपट करण्यास तयार आहे. ह्याच कारणामुळे त्यांचे तब्बल ६ चित्रपट बॅन केले गेले.
चित्रपटात येण्याआधी प्रकाश राज यांनी नाटक तसेच रस्त्यावर आपली कला सादर केली. त्यानंतर त्यांनी मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील अभिनय कौशल्ये पाहून पुढे चित्रपटात कामे मिळाली. १९९४ साली अभिनेत्री ललिता कुमारी सोबत त्यांनी पहिले लग्न केले. मेघना आणि पूजा या दोन मुली त्यांना आहेत. परंतु २००९ साली काही कारणास्तव ललिता आणि प्रकाशराज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लगेचच ऑगस्ट २०१० साली कोरिओग्राफर पोनी वर्मा हिच्यासोबत त्यांनी दुसरे लग्न केले. २०१६ साली म्हणजेच वयाच्या पन्नाशीत ते पुन्हा एका मुलाचे बाप बनून चर्चेत आले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *