आनंदच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल.. कधीही न पाहिलेले हे ७ फोटो नक्की पहा

झी मराठी वाहिनीवरील “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका गेली कित्तेक महिने तीच अव्वल स्थान टिकवून आहे. मालिकेसाठी निवडलेल्या पात्रांनी मालिकेसाठी घेतलेली मेहनत हे त्यांचाच श्रेय म्हणावं लागेल. गुरुनाथ सुभेदार त्याची बायको राधिका सुभेदार आणि ह्या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करण्यासाठी गुरुनाथची आलेली दुसरी बायको “शनया” हि मालिकेतील ३ प्रमुख पात्रे आहेत. यांच्या बरोबर रेवती, गुप्ते, नाना, नानी, गुरुनाथचा मित्र आनंद आणि सल्लागार केडी आणि नुकतीच आलेली शनयाची आई हि पात्रे जोडली गेली, या सर्वांचा मालिकेत पडलेला प्रभाव महत्वाचा आहे.

मालिकेतील गुरुनाथचा मित्र आनंद याचं खरं नाव “मिहीर निशिथ राजदा” असं आहे.नितीश हा खरोखरच गुजराती घरात जन्मला आहे. पण मुंबईत जन्म झाल्यामुळे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. आनंद म्हणजेच मिहीर राजदा हा मुंबई युनिव्हर्सिटीतुन बी. कॉम. ग्रॅज्युएट आहे. मुंबईत कॉलेज करता करता त्याला एकांकिका कराव्याश्या वाटल्या त्यामध्ये तो भाग घेऊ लागला. त्यानंतर त्याला मित्रांनी नाटकांमध्ये काम करायला हवंस आणि तू एक चांगला अभिनेता आहेस तुझं हे ट्यालेंट वाया जाऊ देऊ नकोस असं सांगितलं. मित्रांनीच त्याला व्यावसायिक नाटके मिळवून दिली. मग मागे न पाहता तो इकचंद एक नाटके करत गेला.
मिहीर राजदा त्याच्या कॉलेज जीवनात अगदी हुशार आणि हॅंडसम मुलगा होता. त्याचे पूर्वीचे फोटो पाहता हाच का तो आपला “माझ्या नवऱ्याची बायको” मधील आनंद असा प्रश्न पडतो. आनंद म्हणजेच मिहीर राजदाह्याच्या बद्दल आणखीन जाणून घेऊयात.

“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत आनंद आणि जेनी ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं दाखवलं गेलं, इतकंच काय तर दोघांच्या घरच्यांना लग्नाच्या बोलणीसाठी एकत्र मिळवलं गेलं. खऱ्या आयुष्यात हि आनंदची कहाणी थोडीफार अशीच आहे.
मिहीर राजदा यांनी एका मराठी मुलीशी घरच्यांच्या संमतीने प्रेम विवाह केला. मिहीर राजदा आणि नीलम पांचाळ यांनी २०१० साली लग्न केलं. ह्या दोघांच्या लग्नाचे काही फोटो आम्ही खास तुमच्यासाठी शेअर करत आहोत. २०१३ साली नितीश राजडा आणि नीलम पांचाळ यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुळीच नाव समजू शकलं नाही. पण सध्या हे तिघेही नवी मुंबईत स्थायिक आहेत. मिहीर राजदा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *