आजवरचे मराठीतील सर्वात बोल्ड गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला…तुम्ही पाहिलंत का?

मराठी चित्रपटांची एक वेगळी इमेज या घडीला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मराठीत देखील बॉलिवूड प्रमाणे अडल्ट चित्रपटांचा भरमार दाखल होताना दिसत आहे. सालस, सोज्वळ, विनोदी आणि मनरंजन करणाऱ्या आजवरच्या सिनेमाचे रूप बदलत असल्याने हे बदलेले रूप प्रेक्षक किती आपलेसे करतील यात शंका वाटते. नुकताच मराठीतील “टकाटक” सिनेमाचे ‘ये चंद्राला’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्यात रोमँटिक आणि बोल्ड सीन्सचा भरमार पाहायला मिळत आहे.

अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. २८ जूनला “टकाटक” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रदीप पटवर्धन, भारत गणेशपुरे, उमेश बोलके, प्रथमेश परब, ऋतिक क्षोत्री झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी सांभाळले आहे. आजवरचे मराठीतील हे सर्वात बोल्ड गाणे असल्याचे म्हणणे आहे.याआधी चित्रपटाचे पोस्टर देखील लॉन्च झाले ज्यात ह्या कलाकारांच्या फोटोवरून बोल्ड सिनेमाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे यातून मराठी चित्रपटाचे बदलते रूप प्रेक्षक किती आपलेसे करतील ते येणारा काळच ठरवेल. मोठी स्टारकास्ट लाभलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू नक्कीच चालवेल यात शंका नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *