आगामी चित्रपट हिरकणी मधील या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला “हिरकणी” चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोनाली कुलकर्णी सोबत अभिनेता अमित खेडेकर या देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमोशन अगदी जोरदार झालेले पाहायला मिळते प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट यशस्वी ठरेल अशी निर्मात्यांना खात्री आहे.

अमित खेडेकर याला तुम्ही अनेक चित्रपट, मालिकेत पाहिले असेल. हृदयांतर हा त्याने साकारलेला चित्रपट अरे वेड्या मना, पुढचं पाऊल या मालिका त्याने साकारल्या. ” रायगडाला जेव्हा जाग येते ” या नाटकात त्याने संभाजी महाराज साकारले तर राणी येसूबाईच्या भूमिकेत अभिनेत्री “रश्मी अनपट झळकली.” याच नाटकाच्या निमित्ताने दोघांची भेट घडून आली आणि डिसेंबर २०१३ साली लग्नाची गाठ बांधली. मन उधाण वाऱ्याचे, फ्रेशर्स, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेत रश्मी अनपट झळकली होती. गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर २०१८ रोजी तिने एका मुलाला जन्म दिला त्याचे नाव “अभिर”.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *