आईपेक्षा मुलगी आहे खूपच सुंदर…श्वेता तिवारीच्या मुलीची सगळीकडे होत आहे चर्चा

“कसौटी जिंदगी की” मालिका जवळपास सहा ते सात वर्षे गाजवलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. ह्या मालिकेमुळे श्वेता तिवारीला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या सोज्वळ आणि सुंदर भूमिकेमुळे श्वेताला या चंदेरी दुनेयेत आपले स्थान टिकवून ठेवता आले. तिच्या याच स्वभावामुळे ती बिग बॉसची विजेती देखील बनली होती. अवघ्या १२ व्या वर्षी श्वेताने ५०० रुपये पगारावर ट्रॅव्हल एजन्सीत काम केले होते. वयाच्या १८ व्या वर्षीच राजा चौधरी या भोजपुरी अभिनेत्यासोबत तिने लग्न केले होते.

परंतु काही काळातच तिला खूप वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले होते. राजा चौधरी तिला नेहमी मारहाण करत असल्याने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय तिने घेतला होता. दोघांनाही पलक नावाची मुलगी आहे. विभक्त झाल्यानंतर ती आपली मुलगी पलक सोबत राहत होती. यादरम्यान तिने हिंदी मालिका ,चित्रपट क्षेत्रात आपला चांगला जम बसवला. २०१० साली अभिनेता अभिनव कोहली सोबत तिची ओळख झाली . जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर २०१३ साली दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ह्या लग्नात मुलगी पलक खूप खुश हाती आणि जोरदार नाचली देखील होती.
श्वेता आणि अभिनव कोहली ह्यांना रेयांश नावाचा मुलगा आहे. तर मुलगी काही दिवसांपूर्वीच चित्रपटात डेब्यु करण्यासाठी सज्ज झाली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. श्वेताची मुलगीही तिच्यासारखीच खूप सुंदर दिसत असल्याने आईप्रमाणे तीही या क्षेत्रात येण्यास सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. तारे जमीन पर चित्रपट फेम दर्शील सफारी यासोबत पलक लवकरच “क्विकी” चित्रपटात झळकणार असल्याच्या बातम्या आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *