तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘लाडू’ ने फारच कमी काळात मालिकेत आपला ठसा उमठवला आहे. राणाला म्हणजेच हार्दिक जोशीला सेटवर भेटायला आलेला राजवीरसिंहराजे गायकवाड त्याच मालिकेत भूमिकाही करू लागला. राणाचा फॅन असलेला राजवीर हा ऑन स्क्रीन जशी मेहनत घेतो तशीच मेहनत ऑफ स्क्रीन असतानाही तालमीत घेताना दिसतो. अवघ्या ४ वर्षाचा लाडू तालमीत सर्वांची वाहवा मिळवतो.

तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘लाडू’ चे संपूर्ण नाव “राजवीरसिंहराजे रणजीत गायकवाड” असे आहे. राजवीरसिंहराजे याचा जन्म २२ ऑक्टोबर २०१३ साली सांगली येथे झाला. सध्या राजवीरसिंहराजे हा सध्या ४ वर्षांचा आहे. सध्या त्याचे वजन २५ किलो आहे.

राजवीरसिंहराजे यांचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. ‘लाडू’ चे आजोबा “ कै. विठ्ठल कृष्णा गायकवाड” हे देखील प्रसिद्ध कुस्ती पैलवान होते. राजवीरसिंहराजे पहिलवान व्हावा म्हणून जितके त्याच्या घरचे मेहनत घेतात तितकाच तोहि मेहनत घेताना दिसतो.

‘लाडू’ हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत आहे. तर कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये तो शिकत आहे. त्यामुळे सकाळी लवकर ५ ला उठून तो तालमीत जातो तालमीत तासभर व्यायाम आणि कुस्तीचे धडे घेतो. त्यानंतर तो १० तो १.३० शाळेत जातो. शाळेतून थेट मालिकेच्या सेटवर जातो. संध्याकाळी पुन्हा तालमीत तासभर सराव करतो.

“लाठी-काठी” ह्या शिवकालीन खेळाचाही तो सध्या सराव करतोय. त्याला मर्दानी खेळ खेळायला खूप आवडतात. अभ्यासातही तो तितकाच हुशार आहे.

त्याच्या ह्या आवडीमुळे तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवर त्याला सरावासाठी विशेष जागा देण्यात आली आहे. तेथेही तो मालिकेतील खऱ्याखुऱ्या पहिलवान भाल्या सोबत सर्व करताना पाहायला मिळतो.

उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर पुन्हा शाळा सुरु झाली तेव्हा पहिल्याच दिवशी ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये त्याच जंगी स्वागतही करण्यात आलं. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *