guddi maruti marathi actress

बॉलिवूड चित्रपटातून विनोदी अभिनेत्री म्हणून उदयास आलेली ही अभिनेत्री आहे “गुड्डी मारुती”. तिचे गुड्डी मारुती असे नाव पडण्यामागेही एक मजेशीर गोष्ट आहे. ४ एप्रिल १९५९ रोजी एका मराठी कुटुंबात गुड्डी मारुतीचा जन्म झाला. त्यांचे वडील मारुती परब हे ५० आणि ६० च्या दशकातील चित्रपट अभनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. खान दोस्त, हम सब उस्ताद है, कहीं आर कहीं पार यासारखे चित्रपट त्यांनी साकारले होते. तर आई कमल परब ह्यांनी देखील याच क्षेत्रात काम केले आहे. गुड्डी मारुती हिचे खरे नाव ” ताहिरा परब” असे होते. तिला लाडाने “गुड्डी” असेच म्हटले जायचे. परंतु ताहिराची गुड्डी मारुती कशी झाली याचीही एक रंजक कहाणी आहे.

guddi maruti
guddi maruti

झाले असे कि गुड्डी लहानपणी आपल्या वडिलांसोबत चित्रपटाच्या चित्रीकरण निमित्त सेटवर नेहमीच जायची याच दरम्यान तिला एक बालकलाकार म्हणून ”जान हाजीर है” चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यावेळी सेट वर बऱ्याच जणांनी या मुलीबाबत विचारणा केली. तेव्हा मनमोहन देसाई यांनी गुड्डी हे नाव सांगितले, मग गुड्डी कोणाची मुलगी? म्हटल्यावर मारुतीची हे प्रतिउत्तर मिळू लागले आणि म्हणूनच पुढे ताहीरा परब हिला “गुड्डी मारुती” हेच नाव प्रचलित होत गेले. यानंतर गुड्डी मारुतीला आपल्या शरीरयष्टीमुळे अनेक वेळा लोकांना सामोरे जावे लागत परंतु अशाच भूमिकेमुळे तिला या क्षेत्रात खरी ओळख मिळाल्याने तिने ते बोलणे कधीच मनाला लावून घेतले नाही. पुढे अनेक हिंदी चित्रपटातून विनोदी भूमिका गाजवत असताना अशोक सराफ ,रंजना, कुलदीप पवार यांच्यासोबत तिने “गुपचूप गुपचूप ” हा मराठी चित्रपट साकारला. या चित्रपटातून अशोक सराफ आणि गुड्डी मारुती यांच्या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

gupchup gupchup guddi
gupchup gupchup guddi

इतकेच काय दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्यासोबत तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. चमत्कार, शोला और शबनम , दुल्हे राजा, बीवी नं १, खिलाडी अशा सुपरहिट चित्रपटातून तिला विनोदी वलय असलेल्या सहाय्य्क अभिनेत्रीची भूमिका मिळत गेल्या. तिच्या या भूमिकांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती देखील मिळालेली दिसली मग याच धाटणीच्या तब्ब्ल ९० हुन अधिक हिंदी चित्रपटात तिची वर्णी लागली. इधर उधर, डोली अरमानों कि, ये उन दिनों कि बात है सारख्या छोट्या पडद्यावरील मालिका साकारल्या. अभिनयाचा हा प्रवास चालू असताना प्रसिद्ध बिजनेसमन अशोक यांच्यासोबत तीने लग्न केले आणि काही काळ याक्षेत्रापासून काढता पाय घेतला परंतु पुन्हा एकदा नव्याने २०१५ साली हम सब उल्लू है चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करत आपल्या अभिनयाची झलक दाखवुन दिली. हॅलो जिंदगी या तीन अभिनित केलेल्या नाटकाला तुफान प्रतिसाद देखील मिळाला. शिवाय माय स्केप सारखी शॉर्टफिल्मही तीने साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *