मराठीतला सुपरस्टार “सम्राट अशोक” यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी नागपूर येथे झाला. त्यानंतर त्यांचं बालपण चिखलवाडी मुंबई येथे गेलं, तर शेठ D.G.T. हाय स्कुल, गिरगांव मधून शिक्षण घेतलं. “जानकी” या मराठी सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर बऱ्याच कलानी त्यांना लीड रोल ची भूमिका मिळाली. त्याकाळी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर हे मराठीतले दिग्गज कलाकार होते. त्यांनी एकत्रित हि बरेच चित्रपट केले. “अरे संसार संसार” या चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यान चित्रपटातील अभिनेत्री रंजना देशमुख आणि अशोक सराफ या दोघांचं प्रेम जुळलं. त्यांनी आणखीन बरेच चित्रपट केले “गुपचूप गुपचूप”, “बिनकामाचा नवरा”. दोघांची जोडी लोकांनाही आवडू लागली. पुढे त्यांनी बरेच सिनेमे एकत्रित केले.

ashok saraf
अभिनेत्री रंजना देशमुख आणि अशोक सराफ दोघांचे प्रेम संबंध होते लवकरच ते लग्न हि करणार होते पण १९८७ साली बँगलोर येथे “झंजार” चित्रपटाच्या शूटिंगला जाताना रंजना देशमुख यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. तरीही अशोक सराफ यांनी त्यांना लग्नासाठी मागणी घातली. तेंव्हा त्यांनी अशोकजींना नकार दिला. वयाच्या ४५ व्या वर्षी हार्टअटयाकनी त्यांचा मृत्यू झाला.


पुढे अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटात एन्ट्री केली बऱ्याच टीव्ही मालिकाही केल्या. पण त्यात ते जास्त काळ रमले नाही. पुन्हा ते मराठीकडे वळले. पुढे शूटिंग दरम्यान निवेदिता जोशी यांनी अशोक सराफ याना लग्नाची मागणी घातली आणि दोघांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगाही आहे त्याच नाव “अनिकेत सराफ”. पुढे दोघांनी “अनिकेत टेलिफिल्मस” नावानी मराठी आणि हिंदी साठी प्रोडक्षण हाऊस उभारलं, परंतु २०१२ साली मुंबई-पुणे हायवे वर तळेगाव येथे सराफ यांचा अपघात झाला त्यातून ते कसेबसे बचावले परंतु प्रोडूकशन हाऊस बंद पडले. सध्या हे तिघेही मुंबईत राहतात. अशोक सराफांची ३०० हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट केले. त्यात त्यांना २५ अवॉर्ड मिळाले नुकताच महाराष्ट्राचा फेव्हरेट कॉमेडी कलाकार हा झी वाहिनीचा सर्वात मोठा अवॉर्ड हि मिळाला.आणि सम्राट अशोक हि पदवीही मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *