“अशी ही बनवाबनवी” चित्रपट ओरिजनल नसल्याचे खळबळजनक वृत्त आले समोर…ओरिजनल चित्रपटाचे नाव जाणून आश्चर्य वाटेल

मराठी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी चित्रपट म्हणजे “अशी ही बनवाबनवी”. १९८८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे यासारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने थेटरमध्ये हा चित्रपट दणाणून सोडला होता. विनोदाचे अचूक टायमिंग नेमके काय असते ते हा चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते. आज इतकी वर्षे झाली तरी या चित्रपटाची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. परंतु हो, अशी ही बनवाबनवी हा चित्रपट ओरिजनल नसल्याच्या वृत्ताने तुम्ही नक्कीच आश्चर्य चकित व्हाल .

१९६६ रोजी प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट “बीबी और मकान ” याच्या कथानकावरूनच मराठीतून “अशी ही बनवाबनवी” चित्रपट बनवण्यात आला आहे. यासोबतच कन्नड मध्येही २००३ साली “ओलू साल बरी ओलु” या नावानेही असा चित्रपट बनवण्यात आला. बीबी और मकान चित्रपट चार मित्रांच्या जीवनावर आधारित आहे राहण्यासाठी घर मिळावे म्हणून एका भाड्याच्या घरात हे जोडी बनवून राहू लागले, शिवाय घरमलकाच्या दोन मुलींनाही त्यांनी पटवले होते असे हे रंजक कथानक आपल्याला अशी ही बनवाबनवी चित्रपटात देखील पाहायला मिळाले.
हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला “बीबी और मकान” चित्रपटात प्रमुख भूमिकेत विश्वनाथ चॅटर्जी, कल्पना मोहन, मेहमुद यांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट गाजवला होता. या चित्रपटाच्या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती गुगलवर देखील पाहायला मिळेल ज्यात अशी ही बनवाबनवी चित्रपटाबद्दल देखील माहिती दिली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *