“अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच ‘शंतनू’ बद्दल हे वाचून तुम्हाला धक्का बसेल..

“अशी ही बनवाबनवी” चित्रपटात मराठीतील अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यातील धंनंजय माने म्हणजेच अशोक सराफ यांच्या भावाची भूमिका शंतनु म्हणजेच सिद्धार्थ रे यांनी साकारली होती.

१९ जुलै १९६३ साली त्यांचा जन्म एक मराठी – जैन कुटुंबात झाला. सिद्धार्थ रे हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचे नातू आहेत. व्ही शांताराम यांच्या मुलीचे नाव चारुशीला रे त्यांचा हा मुलगा होय.

बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटात त्यांनी अल्का कुबल यांच्या पतीची भूमिका पार पाडली होती. “चाणी ” या रंजनाच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून वावरले होते. बाजीगर, परवाने, वंश, जानी दुश्मन ,पहचान अशा अनेक बॉलिवूड चित्रपट त्यांनी साकारले होते. “चरस” हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

वयाच्या अवघ्या ४० साव्या वर्षी महणजेच ८ मार्च २००४ साली या अभिनेत्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला.त्यांच्या जाण्याने अवघ्या सिने सृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. १९९९ साली सिद्धार्थ रे यांचे लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत झाले होते. त्यांना सोनिया आणि शिशया नावाची दोन मुले आहेत.

चारुशीला यांनी तामिळ, तेलगू तसेच बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. फुल और अंगार, मेहेरबान, मेरा सजना साथ निभाना, सौगंध, इक्के पे इक्का या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार , मिथुन दा यांच्यासोबत काम केले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *