“अशी हि बनवा बनवी” चित्रपटातला झाली ३० वर्ष पूर्ण..चित्रपटाबद्दल माहित नसलेल्या ह्या ८ गोष्टी जाणून तुम्ही थक्क व्हाल

अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे “अशी ही बनवाबनवी” या चित्रपटातील सर्व कलाकार हे उत्तम विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूप विनोदी आहे.२३ सप्टेंबर १९८८ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला. त्याकाळी अवघ ३ रुपयांचं तिकीट असूनही च्या चित्रपटाने ३ कोटींची मजल मारली. ह्या चित्रपटाबद्दल काही मजेशीर आणि माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.

१) अशी हि बनवा बनवी ह्या चित्रपटाचे लेखन (स्टोरी) “वसंत सबनीस” यांनी लिहली आहे. गेला माधव कुणीकडे, घरोघरी हीच बोंब, चतुर किती बायका, सौजन्याची ऐशीतैशी अश्या अनेक नाटकांचं लेखन ह्या महान लेखकांनी केलं. १५ ऑक्टोबर २००२ रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा स्वास घेतला. पण त्यांचं लेखन यापुढेही अजरामर राहील यात शंका नाही. वसंत सबनीस यांनी लिहलेली अनेक नाटक आजही रणभूमी गाजवताना पाहायला मिळतात.

२) अशी हि बनवा बनवी ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन “सचिन पिळगांवकर” यांनी केलं. ह्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या वेळी सचिन पिळगावकरांनी सुप्रिया पिळगांवकर याना लग्नासाठी मागणी घातली. पुढे त्यांनी “माझा पती करोडपती” आणि “नवरी मिळे नवर्‍याला” ह्या चित्रपटात एकत्र कामे केली. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनीच केलं. त्यामुळे ह्या चित्रपटांची नावे हि त्यांच्या खऱ्या आयुष्याशी निगडित असलेलीच आहेत.

३) अशी हि बनवा बनवी चित्रपटातील कलाकारांच्या जोड्या ह्या त्यांच्या जीवनातील खऱ्या जोड्या ठरल्या. एकाच चित्रपटात लक्षमिकांत बेर्डे-प्रिया अरुण तसेच सचिन पिळगांवकर-सुप्रिया पिळगांवकर यांच्या जोड्या आणि थोडी तुटलेली जोडी म्हणजे अशोक सराफ यांची जोडीदार अश्विनी भावे ह्यांच्या ऐवजी वास्तविक जीवनात अशोक सराफ-निवेदिता जोशी यांच्या जोड्या जुळल्या.

४) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचे सिद्धार्थ रे हे नातू आहेत. व्ही शांताराम यांच्या मुलीचे नाव चारुशीला रे त्यांचा हा मुलगा होय. चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांचा भाऊ शंतनू माने ह्यांची भूमिका साकारली. १९९९ साली सिद्धार्थ रे यांचे लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत झाले होते. त्यांना सोनिया आणि शिशया नावाची दोन मुले आहेत. वयाच्या अवघ्या ४० साव्या वर्षी महणजेच ८ मार्च २००४ साली या अभिनेत्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला.

५) अशी ही बनवाबनवी चित्रपटात घरमालकीण लीलाबाई काळभोर ह्यांची भूमिका “नयनतारा व्होरा” यांनी निभावली. आनंदी आनंद आणि सगळीकडे बोंबाबोंब ह्या चित्रपटही त्यांचा अभिनय पाहून सचिन पिळगावकरांनी त्यांना लीलाबाई काळभोर यांची भूमिका करायला सांगितली. कदाचित तुम्हाला हे वाचून धक्का बसेल २००३ साली नयनतारा व्होरा याना मधुमेहाचा असह्य त्रास होऊ लागला. मधुमेहामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला होता. प्रकृतिअस्वास्थ्यामुळं नयनतारा शेवटची १० वर्षे सिनेनाट्यसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका केली होती. हे नाटक सुपरहिट झाले. त्यानंतर नाटक आणि सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या आईची अनेकदा भूमिका केल्याने त्या लक्ष्याची आई म्हणून ओळखल्या जात होत्या.

६) अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्यावेळी अश्विनी भावे ह्यांचं वय फक्त १६ वर्षाच्या होत्या. अश्विनी भावे यांचा जन्म ७ मे १९७२ रोजी सायन मुंबई येथे झाला. “अशी ही बनवाबनवी” हा त्यांनी साकारलेला ३ रा मराठी चित्रपट होता ह्या पूर्वी त्यांनी “राजलक्ष्मी ” आणि “किस बाई किस ” हे दोनच मराठी चित्रपट साकारले होते. अशी ही बनवाबनवी चित्रपटामुळेच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि पुढे त्यांना हिंदी चित्रपटात काम करायची संधी मिळाली. अश्विनी भावे यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनीला आता दोन मुले आहेत आणि ती सन फ्रॅन्सिस्कोला (अमेरिका) रहाते.

७) अशी ही बनवाबनवी चित्रपटात “विश्वास सरपोतदार” घरमालकाची भूमिका साकारणारा अवली कलाकार “सुधीर जोशी” होय. सुधीर जोशी यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. मुंबईतल्या ब्लॅकी ॲंड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते. कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ख्याती होती. चित्रपटांपेक्षा नाटकावर त्यांचा जास्त भर असायचा. नोव्हेंबर, २००५ मध्ये “हसता हसता” या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान सुधीर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. तेथून मुंबईत परतल्यानंतर १४ डिसेंबर, २००५ रोजी दुपारी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. शिवाजी पार्क येथील शुश्रूषा इस्पितळात नेले जात असताना त्यांचे निधन झाले.

८) अशी ही बनवाबनवी चित्रपटाची रिलीज होण्याची तारीख फिक्स नव्हती. जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेंव्हा ह्या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाची ख्याती खूप वाढली. ह्याची झळ हिंदी चित्रपटांना देखील लागली. यामुळे १९८८ साली रिलीज झालेले बहुतेक हिंदी चित्रपट मोठ्या पाड्यावर जोरदार आपटले. ह्यामुळे १९८८ साली रिलीज होणारे हिंदी चित्रपट “हिरो हिरालाल”, “चांदणी” आणि “त्रिदेव” ह्यांसारख्या चित्रपटांची तारीख पुढे ढकलण्यात आलेली. त्याकाळी मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळायचा हे ह्यातून सिद्ध व्हायचे. अवघ्या ३ रुपयांच्या तिकिटावर ह्या चित्रपटाने ३ कोटींचा टप्पा पार पडला. जे हिंदी चित्रपट करू शकत नव्हते ते ह्या मराठी चित्रपटानं करून दाखवलं.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *