अमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९८० साली पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण (mbbs) पूर्ण केले.

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘राजा शिव छत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. तसेच आता नवीन सुरु झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये हि त्यांनी संभाजी महाराज या पात्राची भूमिका करत आहेत. महानाटक शिवपुत्र शंभूराजे हे त्यांचे तुफान गाजलेले नाटक. तसेच अरे आवाज कुणाचा, आघात, ऑन ड्यूटी २४ तास, मराठी टायगर्स , रमा माधव आणि साहेब यांसारखे चित्रपट हि केले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी अाश्विनी ह्याही डॉक्टर असून डॉ. अाश्विनी ह्या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. अमोल आणि अाश्विनी ह्यांना दोन मुले आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा त्याची नावे आद्या आणि रुद्र. डॉ. अमोल कोल्हे सध्या मुंबईत स्थायिक असून ते नेहमीच सहपरिवार गडकिल्ले भ्रमंती करीत असतात.

डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते सध्या (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.

सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेत ते शंभू महाराजांची भूमिका साकारताना दिसतात. या आधीही अनेक नाटकांत अमोल कोल्हे यांनी शंभू महाराजांची भूमिका साकारली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *