अमेरिकेतील हा संशोधक आहे मराठीतील टॉपच्या अभिनेत्रीचा पती…इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी सर्वात आधी तुमच्यासमोर

अमेरिकेत “नॉस्ट्रम फार्मासिटीकल्स” कंपनीचे फाऊंडर आहेत डॉ निर्मल मुळ्ये. निर्मल मुळ्ये हे महाराष्ट्रातील संगमेश्वर ह्या छोट्याशा गावचे राहणारे. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून बीएस ची पदवी प्राप्त केली तर पुढील शिक्षण त्यांनी टेम्पल युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले. फार्मासिस्ट मध्ये एक नामवंत संशोधक म्हणून त्यांनी परदेशात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. synovics farmasist मध्ये त्यांनी चीफ सायंटिस्ट पदाचा कार्यभार देखील सांभाळला आहे. डॉ निर्मल मुळ्ये ह्यांची पत्नी आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री “अर्चना जोगळेकर”.

अर्चना जोगळेकर ह्यांनी ९० च्या दशकात मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले होते. एका पेक्षा एक, रंगत संगत, अनपेक्षित, निवडुंग , संसार, ह्यासारख्या अनेक मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. अर्चना जोगळेकर ह्या उत्तम नृत्यांगना देखील आहेत. त्यांच्या आई आशा जोगळेकर ह्या प्रसिद्ध नृत्य शिक्षिका त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अर्चना यांनी नृत्याचे धडे गिरवले. वेगवेगळे इव्हेंट आणि चित्रपट साकारत असतानाच अर्चना आणि निर्मल ह्यांची भेट घडून आली. निर्मल हे आपल्या भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाले होते तिथेच त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः लग्न कधी करणार हा प्रश्न विचारून लग्नासाठी अर्चना जोगळेकरचे नाव सुचवले.
अर्चना त्यावेळी प्रसिद्धीच्या झोतात असल्याने ती माझ्याशी लग्न कशी करणार हा प्रश्न विचारून निर्मल यांनी विषयाला फाटा दिला. एका इव्हेंटमध्ये अर्चना आणि शोभा मुद्गल ह्यांना परफार्मन्स करण्यासाठी बोलावले होते. कार्यक्रमाचे आयोजक निर्मलला घेऊन तिथे गेले. परंतु परफॉर्मन्स असल्याने अर्चना यांनी त्यांना तिथेच थांबण्यास सांगितले. कार्यक्रम आटोपल्यावर आयोजकांनी अर्चना आणि निर्मल यांची भेट घडवून आणली. त्यावेळी निर्मल यांनी आपले कार्ड अर्चनाच्या हातात दिले त्यात “पीएचडी आणि नॉस्ट्रम फार्मासिटीकल्स चे प्रेसिडेंट ” असे पाहिल्यावर त्यांनी पुढेही भेट घेण्याबाबत उत्सुकता दर्शवली. याअगोदर अर्चना यांनी अनेक स्थळांना नकार दिला होता.

परंतु निर्मल ह्यांचे कर्तृत्व पाहून त्यांनी भेट घेण्यास सहमती दर्शवली. लगेचच पाच सहा दिवसांनी दोघे एकमेकांना भेटल्यानंतर अर्चना यांनी आपल्या वडिलांना फोन करून ‘मी लग्न करते’ असे सांगितले. आपली मुलगी कोणाशी लग्न करते याबाबत तिच्या घरच्यांनाही उत्सुकता लागून राहिली. कारण नृत्य हा आपला श्वास मानणारी आपली मुलगी चक्क एका परदेशी मुलासोबत लग्न करणार हे त्यांना आश्चर्यचकित करणारे होते.
२५ जानेवारी १९९९ रोजी अर्चना आणि निर्मल ह्यांची पहिल्यांदा भेट झाली त्यानंतर १३ फेब्रुवारीला अर्चनाला परफॉर्मन्स करण्यासाठी अमेरिकेत जावे लागले तिथे निर्मलने अर्चनाची भेट घेतली आणि १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी चॉकलेटने सजवलेल्या बॉक्समध्ये अंगठी ठेऊन प्रपोज केले. त्यानंतर काही महिन्यातच अर्चना आणि निर्मल विवाहबंधनात अडकले. अर्चना लग्न करून न्यू जर्सीत स्थायिक झाली असली तरी तिने स्वतःचे नृत्याचे क्लासेस सुरू केले आहेत. अनेकवेळा ती भारतात येऊन आपली कला सादर करताना दिसते. अर्चना आणि निर्मल मुळ्ये ह्यांना ध्रुव नावाचा मुलगा आहे. ध्रुव एक उत्कृष्ट तबला वादक आहे. श्रीपाद जेल, पं मुकुंदराज देव, पं किशनमोहन महाराज ह्यांच्याकडून त्याने त्याचे धडे गिरवले आहेत. आपल्या आईसोबत तोदेखील भारतात येऊन आपली कला जोपासताना दिसतो.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *