कुली हा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपटांपैकी एक. याच चित्रपटातील एका सिनमुळे ते मरणाच्या दारातुन सुखरूप बाहेर आले होते. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि पुनीत ईसार या दोघांचा फाईट सिन होता. हा फाईट सिन शूट होत असताना अमिताभ बच्चन एका लाकडी फळीवर जाऊन आदळतात तिथेच पुनीत त्यांच्या पोटावर जोरदार वार करतो. याच सिन दरम्यान अमिताभ यांना खूप वेदना होऊ लागतात. तशाच अवस्थेत असताना त्यांनी चित्रपटाचे निर्देशक मनमोहन देसाई यांना शूटिंग थांबवण्यासाठी सांगितले होते. परंतु दवाखान्यात न जाता त्यांनी हे दुखणे तसेच अंगावर काढले.

त्यानंतर मात्र अमिताभ बच्चन याना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. डॉक्टरांनाही बोलवल्यावर त्यांना कुठलेच निदान न करता आल्याने ताबडतोब अमिताभ बच्चन यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत एवढी नाजूक झाली होती की सर्वच स्तरातून त्यांची काळजी केली जात होती. ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा अनेक चाहत्यानी ते सुखरूप वाचावेत म्हणून प्रार्थना केली होती. यादरम्यान मात्र या सर्व घटनेचे खापर अभिनेता पुनीत ईसारवर फोडण्यात आले होते. अनेकांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती एवढेच नाही तर त्यांना अपराधी ठरवण्यात आले होते. या घटनेने खचून गेलेले पुनीत ईसार हे देखील स्वतःला दोषी ठरवत होते. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले होते.

त्यानंतर त्यांना मनमोहन देसाई यांचा फोन आला आणि ब्रीच कँडी मध्ये ये असे सांगितले. तिथे गेल्यावर मात्र अगदी अपराधी भावनेने त्यांनी अमिताभ यांच्यासमोर हात जोडून माफी मागितली होती. परंतु या सर्वात तुझा कुठलाच दोष नसल्याचे म्हणत अमिताभ बच्चन यांनी मोठ्या मनाने पुनीतला माफ केले होते. या घटनेनंतर मात्र पुनीतलाच दोषी ठरवण्यात आल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती .एवढे की त्यांना सलग तीन ते चार वर्षे कुठल्याच चित्रपटात कामही मिळत नव्हते. ६ वर्षाच्या गॅपनंतर अखेर त्यांना बी आर चोप्रा यांच्या महाभारत मध्ये दुर्योधन साकारण्याची संधी मिळाली होती. ही बाब त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलून दाखवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *