मराठीतील सर्वात लोकप्रिय आणि आता हिंदी चित्रपटांकडे वळलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचा घटस्फोट झाला असल्याची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध छाया चित्रकार तेजस नेरुरकरच्या फोटोशूटमुळे सई चर्चेचा विषय बनली आहे. यानिमित्त सईच्या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती काढल्यानंतर तिचा दीड वर्षापूर्वीच घटस्फोट झाल्याची माहिती खुद्द सईने एका वृत्तवाहिनीला दिली आहे. यादरम्यानच एका मुलाखतीत सईने ती पुन्हा प्रेमात पडल्याचेही सांगितले आहे.

तिच्या घटस्फोटाची बातमी आजवर कोणाला माहित नसल्यामुळे आज अशी बातमी वाचून कित्तेक चाहत्यांना धक्का बसलाय. सईने अमेय गोसावी या तरुणासोबत १५ डिसेंबर २०१३ साली लग्न केले होते. लग्नात अनेक मान्यवर आणि सिनेजगतातील बऱ्याच मंडळींनी हजेरीही लावली होती. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. सईने लग्नादरम्यान तिचा पती आणि त्याच्या कुटुंबातील सर्वजण तिच्या प्रोफेशनसाठी खूप सपोर्टीव असल्याचे सांगितले होते. यानंतर हा घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे हा प्रश्न आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच तिने फोटो शूट करून घेतले असून या फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सईचा बोल्ड लुक आणि तिने कमी केलेले वजन आणि पिळदार शरीर म्हणजेच ऍप्स पाहायला मिळत आहे.

सईचा पती अमेय गोस्वामी मुळचा पुण्याचा आहे आणि तोही मराठी सिनेसृष्टी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे त्याची स्वतःची लोडींग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. अमेय आणि सई यांनी कधीच सोबत काम केले नाही. तीन वर्षाच्या डेटींगनंतर सई आणि अमेय यांनी लग्न केले होते. विशेष म्हणजे या नात्याचा पुढाकारही सईने घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *