अभिनेत्री “मृणाल दुसानिस” हिचे फोटो पाहून तिच्या नवऱ्याने लग्नाआधी विचारला होता ‘हा’ प्रश्न

काही काळापूर्वी मृणाल दुसानिस या अभिनेत्रीने आपली प्रमुख भूमिका असलेली संतोष जुवेकर सोबतची मालिका ” अस्स सासर सुरेख बाई ” अर्धवट सोडून अमेरिकेत आपल्या पतीसोबत स्थायिक होणार अशी बातमी हाती आली होती. त्यानंतर नुकतीच कलर्स वाहिनीवर तिची नवी मालिका “हे मन बावरे ” येत्या ९ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. त्यामुळे मृणाल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत असल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. शशांक केतकर या मालिकेत तिचा सहकलाकार म्हणून झळकणार आहे. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री प्रथमच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

तसे पाहता मृणाल दुसानिस हिचा असंख्य चाहता वर्ग असल्याने सोशल मीडियावर ती नेहमीच ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. तिचे लग्न जुळले तेव्हा घडलेली एक मजेशीर गोष्ट येथे आवर्जून सांगावीशी वाटते…
मृणालचे लग्न पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरे यांच्यासोबत जुळले. लग्नाआधी दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. मृणाल ही एक अभिनेत्री आहे असे कळल्यावर निरजने तिचे फोटो सोशल मीडियावर सर्च केले. त्याने सर्च केलेल्या बहुतेक फोटोपैकी तिचे सर्वच फोटो साडी आणि सलवार कमीज मधीलच असल्याने त्याने पुढच्या भेटीत न राहवून ….तू कधीच वेस्टर्न आऊटफिट घालत नाही का? असा प्रश्न विचारला होता. आजवर मृणालने कधीच आपले मॉडेल लुकमधील फोटो शेअर केल्याचे पाहिले नाही. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री असूनही साधी, सरळ राहणारी मृणाल त्याच्या मनाला भावली आणि २५ फेब्रुवारी २०१६ साली त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *