अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत रोमँटिक फोटो काढणारा हा युवक आहे तरी कोण ? वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधात तिच्याच एका लेडी फॅशन डिझायनने शिवीगाळ आणि मारहाणीचा खळबळजनक आरोप केला होता. यामुळे ह्या दोघीही चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. हेच कारण कि काय थोडा विसावा आणि अभिनय क्षेत्रापासून थोडं दूर राहण्यासाठी ती नुकतीच युरोप टूरला गेली. तिथे तिने अनेक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. पण त्या फोटोंमध्ये एका युवकाचा फोटो आणि त्यावर लिहलेला मजकूर ह्यामुळे तिच्यासोबत असलेला हा युवक आहे तरी कोण असा प्रश्न तिला अनेकांनी विचारला.

त्या फोटोवर तिने असे लिहले आहे कि “युरोप च्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा…” ह्यामुळे अनेकांचा गैरसमज होताना पाहायला मिळाला. हा युवक दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाऊ आहे. होय हा प्राजक्ता माळी हीच भाऊच आहे. तुम्ही तिचे आधीचे फॅमिली फोटो पाहिले असतील तर तुम्हाला ह्या युवकाचे दर्शन घडले असेल.
प्राजक्ताने फोटोसोबत आणखीन पुढे लिहिले आहे “तू माझे खूप सारे फोटो काढल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. भावा… तू माझ्यासाठी फोटो खूप चांगल्याप्रकारे काढलेस. तू खूप कूल आहेस छत्रपाल… जसा आहेस तसाच कायम राहा.” बहीण भावाबद्दल हे प्रेम थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रकट केल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. पण जेव्हा अनेकांनी कमेंट करत तो तिचा भाऊ आहे असे सांगितल्यावर तिच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो युवकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *