pooja pawar actress sashank

एक होता विदूषक, सर्जा, झपाटलेला यासारख्या दर्जेदार चित्रपटातून नायिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे “पूजा पवार”. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या. बाप माणूस ही आणखी एक मालिका त्यांनी अभिनित केली होती. दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या “मराठी तारका” फेसबुक पेजवर नुकतेच लाईव्ह येऊन त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यात त्यांनी शशांक केतकर सोबत आलेल्या एका अनुभवाचा उल्लेख केलाला पाहायला मिळाला त्याबद्दल जाणून घेऊयात …

pooja pawar mahesh tilekar
pooja pawar mahesh tilekar

पूजा पवार यांनी शशांक केतकर सोबत एक सीरिअल केली होती. महेश कोठारे यांच्या “फिरुनी नवी जन्मेन मी” या सिरीअलमध्ये पूजा पवार यांच्या मुलाची भूमिका शशांकने केली होती शशांक त्यावेळी नवखा कलाकार होता. एकदा त्याचे ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक पाहण्यासाठी पूजा पवार गेल्या असता शशांकने त्यांना साधी ओळखही दाखवली नाही. ही बाब महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. याच अनुषंगाने एका चाहत्याने त्यांना हे खरं आहे का याबाबत स्पष्टीकरण विचारले. तेव्हा पूजा पवार यांनी या गोष्टीला दुजोरा देत हे खरं आहे असं म्हणाल्या. शशांकने मला पाहूनही त्यावेळी ओळख दिली नाही…जेव्हा एखादा ज्येष्ठ कलाकार तुम्हाला समोर दिसतो तेव्हा तुम्ही त्याला कमीतकमी हाय हॅलो करू शकता याचीच दुसरी बाजूही त्यांनी सांगितली की एकदा एका कार्यक्रमात सुलोचना दीदींनी स्वतः ओळख दाखवून माझी दखल घेत आपल्या शेजारी बसण्यास सांगितले होते. तेव्हा एवढ्या मोठ्या कलाकारांकडून आपली दखल घेतली जाते तेव्हा शशांक सारखी मुले अशी का अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात? हे समजत नाही…अशी कितीतरी मुलं आहेत जी सिनिअर कलाकारांना साधं हॅलो सुद्धा बोलत नाहीत तेव्हा वाईट वाटतं… अशी थेट प्रतिक्रिया दिली आहे. ही एक छोटीशी गोष्ट असली तरी आजच्या मुलांनी मोठ्यांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे अशी एक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान महेश टिळेकर यांनी या गोष्टीची दखल घेत हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *