अभिनेते “कुलदीप पवार” यांची हि आहे फॅमिली काहीही न पाहिलेले हे फोटोज खास तुमच्यासाठी

“पाहिले न मी तुला…” गुपचुप गुपचूप चित्रपटातील हे गाणे अभिनेते कुलदीप पवार यांच्यावर चित्रित झाले होते. हे गाणे आजही अनेक रसिकांना नक्कीच गुणगुणावेसे वाटत असेल यात शंका नाही. या लेखाच्या माध्यमातून मराठीतील या दिग्गज कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दलची माहिती तुमच्यापर्यत पोहोचवायची आहे त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. दिवंगत अभिनेते कुलदीप पवार यांचा जन्म १० जून १९४९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे आजोबा हे शाहू महाराजांच्या कार्यकाळात वीज वितरण विभागात कार्यरत होते.

त्यांच्या आईचे नाव शांतादेवी आणि वडील वसंतराव पवार. वडील मराठी सिने सृष्टीत छोट्या भूमिका साकारत त्यामुळे सहाजिकच अभिनयाची आवड कुलदीप पवार यांच्यातही निर्माण झाली. कोल्हापूर येथून शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले तिथे प्रभाकर पणशीकर यांनी ” इथे ओशाळला मृत्यू ” ह्या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजलीदेखील. बिन कामाचा नवरा, शापित, वजीर, अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप, वेध, सर्जा, एका पेक्षा एक, गोष्ट धमाल नाम्याची, जाऊ तिथे खाऊ अशा वेगवेगळ्या चित्रपटात त्यांनी अनेक धाटणीच्या भूमिका साकारुन आघाडीच्या नायकांमध्ये आपले नाव कोरले. रंजना आणि कुलदीप पवार यांनी एकत्रित अनेक चित्रपट साकारले, या जोडीला प्रेक्षकांकडून विशेष पसंती देखील मिळाली. तू तू मै मै, दामिनी, आक्रोश, संसार या छोट्या पडद्यावरील मालिकाही त्यांनी साकारल्या. त्यांच्यातील अभिजात कलागुणांमुळे त्यांनी विनोदी तसेच खलनायकाच्या भूमिकाही तितक्याच नेटाने निभावल्या. पती सगळे उचापती, वीज म्हणाली धरतीला, अश्रूंची झाली फुले ही नाटके त्यांनी रंगमंचावर गाजवली.

२४ मार्च २०१४ रोजी किडनी निकामी झाल्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनि अखेरचा श्वास घेतला. कुलदीप पवार यांच्या पत्नीचे नाव नीलिमा पवार. नीलिमा पवार या देखील नाट्यक्षेत्रात कार्यरत होत्या. नीलिमा आणि कुलदीप पवार यांना दोन अपत्ये थोरला ऐश्वर्य आणि धाकटा समृद्ध . ऐश्वर्य याने कोल्हापूर येथील डी वाय पाटील कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे . सध्या एका खाजगी कंपनीत असोसिएट डायरेक्टर पदावर तो कार्यरत आहे. त्याची पत्नी अवंती या शिक्षिका म्हणून खाजगी शाळेत कार्यरत आहेत. कुलदीप पवार यांचा धाकटा मुलगा समृद्ध याचे श्वेता सोबत लग्न झाले. त्यांना द्रीश्या नावाची मुलगी आहे. सध्या हे कुटुंब मुंबईत स्थायिक असले तरी या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणे त्यांनी पसंत केले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *