सुनील बर्वे हे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अभिनेते, निर्माते तसेच उत्कृष्ट गायक म्हणूनही ओळखले जातात. पाटकर कॉलेज, मुंबई येथून केमिस्ट्री विषयातून त्यांनी बी एस्सी ची पदवी प्राप्त केली. पुढे मुंबईमध्ये काही काळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केले. परंतु अभिनयाची आवड असल्याने नाटकात काम करण्याची ईच्छा होती. आणि कालांतराने त्यानी मराठी नाटकांत झेप घेतली. पण आज आपण जाणून घेऊयात त्यांची सुंदर कन्या सानिका बर्वे हिच्याबद्दल …

सुनील बर्वे यांनी चित्रकार अपर्णा हिच्याशी विवाह केला. सुनील आणि अपर्णा बर्वे यांना एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. मुलगा अथर्व बर्वे हा देखील वेगळ्या क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे. तर मुलगी अपर्णा बर्वे हि युएक्स डिझायनर म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनीत कार्यरत आहे. आधी मुंबई नंतर गुजरात, बंगलोर आणि आता गुरगाव हरियाणा अश्या विविध ठिकाणी तिने मायक्रोसॉफ्ट कंपनीसाठी काम केले आहे. तब्बल २१ लाख एवढं तिचं वर्षभराचं पॅकेज आहे. मायक्रोसॉफ्ट सारख्या नामांकित कंपनीत काम करून कंपनीचा आपण एक हिस्सा आहोत याचा तिला अभिमान आहे. ती सांगते कि मला अभिनयाची आवड अजिबात नव्हती पण चांगली नाटके आणि सिनेमे मी नेहमी पाहते. वडिलांनी माझ्यावर तू हे केलं पाहिजेस हे नको असं कधीच सांगितलं नाही त्यांनी नेहमी मला काय आवडत ह्याचाच विचार केला माझ्यावर कधी बंधने लादली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *