महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका साकारणाऱ्या दिग्गज कलाकाराचं नाव आहे जयराम कुलकर्णी. “जयराम कुलकर्णी” हे मराठी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात. आंबेजवळगे हे त्यांचे गाव मूळ गाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात छोटीशी नोकरी पत्करली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अगदी बालवयातच इयत्ता सातवीत असताना त्यांनी शाळेत “मोरूची मावशी” नाटकात मावशीची भूमिका साकारली.

कॉलेजमध्ये त्यांनी “अंमलदार” नाटकात “हणम्या” साकारला. १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूर ला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे हातच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. आकाशवाणीत काम करत असताना अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला. दे दणादण, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला गंमत जंमत, बाळाचे बाप ब्रह्मचारी सारख्या चित्रपटात सरपंच, पाटील, पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा विविधांगी भूमिका साकारल्या. घरात मावणार नाहीत इतकी बक्षिसे त्यांना आजवर मिळालीत. जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ हेमा कुलकर्णी ,तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. जयराम कुलकर्णी यांची सून आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “मृणाल देव- कुलकर्णी”. नामवंत लेखक गो नी दांडेकर यांची ती नात तर प्रा. वीणा देव आणि डॉ विजय देव यांची ती कन्या आहे.

मृणाल “विको” च्या जाहिरातीत पहिल्यांदा झळकली होती असा बरयूच जणांचा समाज पण त्याआधी तिने अनेक चित्रपट हि साकारले आहेत . “माझं सौभाग्य” हा तिने साकारलेला पहिला मराठी चित्रपट. अवंतीका, पिंपळपान, स्वामी, गुंतता हृदय हे सारख्या मराठी मालिका तसेच सोनपरी, द्रौपदी, टीचर, मीरा, श्रीकांत सारख्या हिंदी मालिका तिने गाजवल्या. ” राजा छत्रपती” मधील तिने साकारलेली जिजाऊ विशेष लक्षवेधी ठरली. अभिनयाच्या जोडीलाच तिने दिग्दर्शन क्षेत्रातही यशस्वीरीत्या पाऊल टाकले. जयराम कुलकर्णी यांना वाचनाची आवड आहे मृणालमुळे ही आवड आणखी जोपासली जात असल्याची आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. तर मृणालचा मुलगा “विराजस कुलकर्णी” हा देखील याच क्षेत्रात हळूहळू आपला जम बसवताना दिसत आहे. कुलकर्णी कुरम्बाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *