अण्णाजी दत्तोला ‘हत्तीच्या पायी ‘ देण्याची वेळ आली… ऐतिहासिक घडामोडीमधील रंजक वळण

“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत मागील काही भागापासून वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. यातच अख्या महाराष्ट्राला गहिवरून टाकणारा छत्रपतींचे देहावसन हा एक क्षण दर्शवण्यात आला.क्रूर आणि कपटी कारस्थान रचणाऱ्या आणि या कटात अष्टप्रधान मंडळींनी अण्णाजी पंताला दिलेली साथ याआधी तुम्हाला मालिकेद्वारे अनुभवायला मिळाली. संभाजी महाराजांपासून लपवलेली ही बाब, रायगडावरील अष्टप्रधान मंडळातील कटकारस्थान आणि याच कटातील समोर आलेली सोमजी नावाची एक सोंगटी मालिकेत दर्शवण्यात आली आहे.

इकडे रायगडावर राजाराम महाराजांच्या मंचकरोहनाची तयारी चालू आहे.तर दुसरीकडे संभाजी महाराज पन्हाळ्यावरून रायगडावर कधी पोहोचणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या सर्वातून आता हंबीरराव मोहितेचा चाणाक्षपणा आणि संभाजी महाराजाना कैद करण्यात येणारा पंतांनी रचलेला डाव कसा उधळून लावतात हे आता प्रत्यक्षात येत्या काही भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लवकरच मालिकेत अण्णाजी दत्तो याना हत्तीच्या पायी देण्याची वेळ आली आहे असे म्हणायला हरकत नाही.
“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेत अण्णाजी दत्तो यांची भूमिका अभिनेते ” महेश कोकाटे ” यांनी उत्तम साकारली आहे. ही त्यांची भूमिका विरोधी जरी असली तरी सहज सुंदर अभिनयाने ती उत्तम रंगवली आहे. याआधीही त्यांनी डॉ अमोल कोल्हे यांच्यासोबत ” जनता राजा शिवछत्रपती ” या नाटकात कान्होजी जेधे ,बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिका साकारल्या आहेत. यात त्यांच्या उत्कृष्ट तलवारबाजीची झलकदेखील पाहायला मिळते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *