आजही मराठी चित्रपट सृष्टीतील ओळखली जाणारी सदाबहार कलाकार जोडी म्हणून रमेश देव आणि सीमा देव यांचे नाव घेतले जाते. रमेश देव आणि सीमा देव यांना दोन अपत्ये अजिंक्य आणि अभिनय. अजिंक्य देव यांनी कम्प्युटर सायन्सची पदवी मिळवुन परदेशात स्थायिक व्हायचे असे ठरवले होते परंतु आपल्या मुलाने म्हणजेच अजिंक्यने देखील अभिनय क्षेत्रात यावे अशी रमेश देव यांची मनोमन ईच्छा होती. याच इच्छेखातर अजिंक्य देव यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकून सर्जा हा पहिला चित्रपट साकारला परंतु या चित्रपटा अगोदरच त्यांनी साकारलेला अर्धांगी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटातून अजिंक्यच्या वाट्याला कधी नायक, खलनायक तर कधी सहकलाकार अशा विविधांगी भूमिका आल्या आणि त्या त्याने तितक्याच जबाबदारीने पेलल्या.

अजिंक्य देव यांनी आपली कॉलेजची मैत्रीण आरती सोबत लग्न केले. त्यांची ही लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे… पार्ले कॉलेजमध्ये बीएस्सीच्या पहिल्या वर्गात असताना अजिंक्य देव यांनी आरतीला पाहिले तेव्हा ते तिला पसंत करू लागले होते. तेव्हापासूनच अजिंक्य आरतीच्या प्रेमात पडले. कॉलेजच्या एक्झिबिशन, ट्रेकिंग मध्ये हे दोघेही सहभागी व्हायचे. त्यामुळे अजिंक्य हा रमेश देव यांचा मुलगा आहे हे आरतीला समजले होते. अजिंक्य देव यांनी पुढाकार घेत आरतीला एक दिवस जुहूच्या बीचवर आपल्या गाडीवरून नेले. तिथेच अजिंक्यने आरतीला प्रपोज केले. यावर आरती खूप खुश होईल , तिला हर्षवायू होईल या भ्रमात असतानाच आरती रडायला लागली. त्यामुळे केलेल्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले. त्यानंतरही अनेकदा अजिंक्य आरतीच्या मागे मागे फिरू लागले. परंतु आरतीकडून कुठलीच प्रतिक्रिया मिळत नसे. शेवटी एक दिवस ‘एक तर हो तरी म्हण नाहीतर…नाही तरी म्हण…नाहीतर मी तुला सोडून जाईल ‘ असे म्हणताच अजिंक्य आपल्याला सोडून जाईल या भीतीने आरतीने तिथेच अजिंक्यच्या प्रेमाला होकार दिला. ही बातमी एके दिवशी दोघांनीही आपापल्या घरी सांगितली. त्यावर आरतीच्या घरच्यांच्या मनात थोडीशी शंका उपस्थित झाली…कारण त्यांचे घर सिनेकलाकारांचे ,तो तुला फसवल,तुला सोडून जाईन अशी भीती त्यांना वाटू लागली. परंतु कालांतराने आरतीच्या घरच्यांचाही अजिंक्यवर विश्वास निर्माण होत गेला. अखेर चार वर्षानंतर म्हणजेच ६ डिसेंबर १९८६ रोजी अजिंक्य आणि आरती विवाहबंधनात अडकले.

अजिंक्य आणि आरती यांना आर्या आणि तनया ही दोन अपत्ये झाली. आर्या हा त्यांचा थोरला मुलगा त्याने यूएस मधून बिजनेस आणि मानसशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली आहे. तर तनया ही त्यांची धाकटी मुलगी. तनया अगदी लहान होती तेव्हापासून ती एक स्पेशल चाईल्ड आहे हे अजिंक्य आणि आरतीला कळले होते. त्याप्रमाणेच त्यांनी तिचे पालनपोषण देखील आपुलकीने केले. माझ्याच वाट्याला असे का? असे म्हणत बसण्यापेक्षा हा देवाने आमच्यासाठी दिलेला मोठा आशीर्वाद आहे असे म्हणत या दोघांनी पुढे चालत राहण्याचा आणि तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत राहण्याचा निर्णय घेतला. अंधेरीला “अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट” नावाने स्वतःची शाळा त्यांनी सुरू केली आहे. यातून अशाच मुलांना शिकवण्याचे कार्य आरतीने हाती घेतलेले पाहायला मिळत आहे. यातून लोकांना किती फायदा होतो यापेक्षा त्यातून मिळणारे समाधान माझ्यासाठी खूप मोलाचे आहे असे त्या मानतात. नुकत्याच पार पडलेल्या ‘ मोस्ट पॉवरफुल फेमिना पुणे २०१९’ साठी या योगदानाबद्दल आरती देव यांना सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *