अजय देवगनची ही हीरोइन आहे हेमा मालिनीची भाची… बऱ्याच वर्षानी करतीये बॉलीवुड मध्ये पदार्पण

अजय देवगन याने !१९९१ सालच्या “फूल और कांटे” या चित्रपटातुन बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते याच चित्रपटात अभिनेत्री मधु हीने अजय देवगणच्या प्रेयसीची भूमिका बाजावली होती. या चित्रपटामुळे हे दोघेही रातोरात स्टार बनून गेले होते. मधु ने त्यानंतर रोजा, दिलजले,यशवंत सारखे आणखी हिट चित्रपट साकारले. हिंदी, तमिल, तेलगु, कन्नड़ मध्ये काही निवडक चित्रपटात काम करून तिने या इंडस्ट्रितुन काढता पाय घेतला. आणि १९९९ साली आनंद शाह सोबत विवाहबंधनात अडकली.

दोन मुलींच्या जन्मानंतर मधुने छोट्या पडद्यावरिल देवी, आरंभ सारख्या हिंदी मालिका साकारल्या. मधु ही बॉलीवुड ड्रीम गर्ल हेमा मालिनी ची भाची आहे . मधुचे वडील रघुनाथ हे हेमा मालिनीचे भाऊ आहेत. जवळपास ८ वर्षानी मधु पुन्हा बोलीवुडमध्ये पदर्पणास सज्ज आहे. आगामी चित्रपट “खलबली” या कॉमेडी कम हॉरर चित्रपटात तिला महत्वाचि भूमिका साकारण्याची संधि मिळत आहे. पूर्वी तिने केलेले साऊथ आणि बॉलीवूड चित्रपट चांगलेच लोकप्रिय ठरलेले यशाच्या शिखरावर असताना तिने घेतलेला मोठा ग्याप भरून काढण्यात तिला कितपत यश मिळते ते येणारा काळच ठरवेल.
मधु हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, मधु पुन्हा नक्कीच यशस्वी ठरेल अशी आशा आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *