अग्गबाई सासूबाई हि झी वाहिनीवर कमी दिवसांत चांगली प्रसिद्ध झालेल्या मालिकांपैकी एक म्हणावी लागेल. मालिकेची स्टोरी थोडी हटके असल्यामुळे मालिकेत पुढे काय होणार याची आस लागून राहते. मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात अगदी पात्रांच्या सारखीच असल्यामुळे अभिनय करणे त्यांना अगदी सूट होत असल्याचे दिसते. मालिकेत आसावरी, बबड्या, शुभ्रा, आजोबा, कारखानीस काका तसेच अभीज किचनचे अभिजित राजे हि प्रमुख पात्रे आहेत. मालिकेने अवघ्या २ महिन्यात मराठीतील पहिल्या ५ प्रसिद्ध मालिकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे त्यामुळे मालिकेतील कलाकारांचे मानधनही घसघशीत आहे चला तर मग पाहुयात मालिकेत कोणाला किती मानधन मिळत.

आसावरी – आसावरी हे मालिकेचं प्रमुख पात्र आहे अभिनेत्री “निवेदिता जोशी सराफ” यांनी हे पात्र साकारले आहे. अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून यापूर्वीही आपण त्यांना पहिलय. अशी ही बनवाबनवी, किस बाई किस, चंगू मंगू, दे दणा दण, धूमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला आणि माझा छकुला हे त्यांचे काही खास गाजलेले मराठी चित्रपट. तर सपनो से भरे नैना, सर्व गुण संपन्न ह्या त्यांच्या तितक्याच लोकप्रिय ठरलेल्या मालिका. आपल्या सहज साध्य अभिनयाने अग्गबाई सासूबाई मालिकेतही त्यांनी अगदी साजेसा अभिनय केलाय.
अग्गबाई सासूबाई मालिकेसाठी “निवेदिता सराफ” ह्यांना पर एपिसोड २०,००० रु. इतकं मानधन मिळत. म्हणजे महिन्याकाठी त्यांना जवळपास ४ ते ४.५ लाख रु. इतकं मानधन मिळत.

अभिजित राजे – मालिकेत आसावरी आणि अभिजित राजे यांची आगळीवेगळी प्रेम कहाणी दाखवली आहे त्यामुळे अभिजित राजे यांचं पात्र हि तितकंच महत्वाचं मानलं जात. अभिजित राजे यांची भूमिका “डॉ गिरीश ओक” यांनी साकारली आहे. मराठीच्या दिग्गज कलाकारामध्ये डॉ गिरीश ओक यांची गणती होते. आम्ही असू लाडके, सातच्या आत घरात, जसा बाप तशी पोरं , खेळ सात बाराचा हे त्यांचे काही खास गाजलेले चित्रपट. तर अवंतिका, अरे संसार संसार, बंदिनी, अग्निहोत्र, पिंजरा, पुणेरी मिसळ ह्या त्यांच्या गाजलेल्या मालिका.
अग्गबाई सासूबाई मालिकेसाठी “डॉ गिरीश ओक” ह्यांना पर एपिसोड २०,००० रु. इतकं मानधन मिळत. म्हणजे महिन्याकाठी त्यांना हि जवळपास ४ ते ४.५ लाख रु. इतकं मानधन मिळत.

शुभ्रा – शुभ्रा हि मालिकेतील प्रमुख आसावरी हीची सून दाखवली आहे. शुभ्राची व्यक्तिरेखा अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारली आहे. तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची मुंबईजवळच्या डोंबिवली गावची असून तिने ‘या गोजिरवाण्या घरात’ या टीव्ही सीरीजद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ओलीसुकी, झेंडा, ती सध्या काय करते?, लग्न पहावे करून हे तिचे नावाजलेले चित्रपट तर लेक लाडकी ह्या घरची आणि होणार सून मी ह्या घरची ह्या मालकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या.
अग्गबाई सासूबाई मालिकेसाठी “तेजश्री प्रधान” हिला पर एपिसोड १५,००० रु. इतकं मानधन मिळत. म्हणजे महिन्याकाठी त्यांना हि जवळपास ३ ते ३.५ लाख रु. इतकं मानधन मिळत.

बबड्या – बाबड्या उर्फ “सोहम” ही व्यक्तिरेखा साकारणारा नवखा कलाकार प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “आशुतोष पत्की ” मराठीतील नामवंत संगीतकार अशोक पत्की यांचा हा चिरंजीव आहे.“वन्स मोअर” हा त्याचा पहिला वहिला मराठी चित्रपट त्यानंतर त्याने अग्गबाई सासूबाई हि मालिका साकारली आहे.
अग्गबाई सासूबाई मालिकेसाठी “आशुतोष पत्की” ह्यांला पर एपिसोड १२,००० रु. इतकं मानधन मिळत. म्हणजे महिन्याकाठी त्यांना हि जवळपास २.५ ते ३ लाख रु. इतकं मानधन मिळत.

आजोबा – मालिकेत आसावरी ह्या प्रमुख पात्राचे सासरे म्हणजेच आजोबा “दत्तात्रय” ह्यांची भूमिका “रवी पटवर्धन” यांनी साकारली आहे. युगपुरुष, शेजारी शेजारी, बिनकामाचा नवरा, हफ्ता वसुली हे त्यांचे नावाजलेले चित्रपट. “आमची माती आमची माणसं” ह्या मालिकेपासून ते घर घरात पोहचले.
अग्गबाई सासूबाई मालिकेसाठी “रवी पटवर्धन” ह्यांला पर एपिसोड १०,००० रु. इतकं मानधन मिळत. म्हणजे महिन्याकाठी त्यांना हि जवळपास २ ते २.५ लाख रु. इतकं मानधन मिळत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *