अगागगग… खतरनाक .. ! अशी निलेश साबळे करतो ह्या कलाकार आणि लेखकाची मिमिक्री तर पत्नी हि आहे उत्तम अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक त्याच प्रमाणे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणूनही प्रवीण तरडेचे नाव घेतले जाते. एक उत्तम लेखक म्हणून तो कायम चर्चेत राहिला आहे. पुणे जिल्ह्यातील जातेडे गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याने MBA चे शिक्षण पूर्ण केले आहे. कबड्डी आणि सॉफ्टबॉल या खेळात निपुण असल्याने राष्ट्रीय पातळीवर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही वावरला आहे.

यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना नाटकांचे लिखाण करून प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘कुंकू’ ही त्याची लिहिलेली पाहिलीवहिली मालिका अत्यंत कमी कालावधीतच चांगलीच गाजली. त्यानंतर त्याने तुझं माझं जमेना, पिंजरा, कन्यादान, मेहेंदीच्या पानावर , अनुपमा अशा अनेक मालिकांचे लेखन केले.केवळ लेखणीतूच तो व्यक्त झाला नाही तर त्याने १९९७ सालच्या राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धा जिंकून राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले आहे.


‘ कोकणस्थ’ या चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. २०१५ साली झळकल्या ‘देऊळ बंद ‘ या चित्रपटाचे त्याने लेखक ,दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम पाहिले आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.

फँड्री, हरिश्चंद्राची फॅक्टरी, रेगे, तुकाराम , कोकणस्थ, यलो, नटसम्राट, दणक्यात दणका या चित्रपटात त्याने छोट्यामोठ्या दमदार भूमिकादेखील साकारल्या आहेत. “फर्जंद” या चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. मिफ्टा अवॉर्ड, झी गौरव पुरस्कार तसेच संस्कृती कालादर्पण पुरस्काराने त्याच्यातील कलागुणांना सन्मानित केले आहे.

‘चला हवा येऊ द्या ‘फेम निलेश साबळे यासोबत रूम पार्टनर म्हणून ते एकत्र राहात होते.तेव्हा घडलेल्या त्यांच्यातील गंमतीजमती निलेश साबळेने ‘ चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर शेअर केल्या होत्या. प्रवीण ची हुबेहूब नक्कल ही निलेश साबळे त्याच्या सेटवर नेहमीच साकारताना दिसत असतो.


(photo credit _ Sonal Jagtap)

प्रविणची पत्नी देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचे नाव स्नेहल तरडे. स्नेहलने देखील अनेक नाटकामध्ये सहभाग दर्शवला आहे. त्यासाठी तिला दोनवेळा पुरस्काराने सन्मानित केले आहे. वव्हेंटिलेटर, देऊळ बंद, चिंटू २ या चित्रपटात तिने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. प्रवीण आणि स्नेहल याना एक मुलगाही आहे. प्रवीण लवकरच ‘देऊळबंद २ ‘ चित्रपटच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता सध्या तो ‘ फर्जंद’ चित्रपटाच्या यशाचा आस्वाद घेत आहे. त्याच्या या संपुर्ण यशस्वी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा…!!!

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *