अगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी

बहुतेक वेळा कुटुंबातील बहिण भावंडे दिसायला अगदी एकसारखी असतात. जुळी नसतानादेखील त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काहीना काहीतरी साम्य नक्कीच जाणवेल. तुम्हाला वाचून अतिशयोक्ती वाटेल खरी पण, असेच काहीसे घडले आहे मराठी वाहिनीवर झळकलेल्या अभिनेत्रींच्याबाबतीत. या अभिनेत्रींच्या बहिणींवर नजर टाकल्यास जणू आपल्यासमोर त्यांच्या जुळ्या बहिणीच असल्याचा भास होतो.

१.’तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर आणि अनुजा देवधर

पाठक बाई म्हणून प्रसिद्धीस आलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधरला अनुजा ही मोठी बहिण आहे. आपल्या बहिणीसोबतचे बरेचसे फोटो अक्षया इन्स्टाग्राम व फेसबुकवर शेअर करत असते.

२. चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आणि तिची बहीण तेजल

‘चला हवा येऊ द्या’ कार्यकमामधून सर्वांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिला तेजल ही बहिण आहे. श्रेया आणि तेजलची चेहरेपट्टी अगदी सारखी असून त्यांच्या केवळ उंचीत फरक असल्याचे दिसून येते.

३. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिला गौतमी देशपांडे

“कुंकू” मालिका आणि ‘नटसम्राट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘पुणे व्हाया बिहार’ चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिला गौतमी देशपांडे नावाची लहान बहिण आहे. गौतमी हीसुद्धा एक अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटकांमध्ये काम केले असून ती एक उत्तम गायिकासुद्धा आहे.

४. स्पृहा जोशी आणि क्षिप्रा जोशी


‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ फेम स्पृहा जोशीला क्षिप्रा ही बहिण आहे. क्षिप्रा जोशीने हि कॉलेज मध्ये अनेक नाटकांत कामे केलेली आहेत.

५. अमृता खानविलकर आणि अदिती खानविलकर (बक्षी)

गोलमाल, नटरंग, बाजी, वेलकम, कट्यार काळजात घुसली अश्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात झळकलेले अभिनेत्री अमृता खानविलकर हिला अदिती नावाची छोटी बहीण आहे. ती एअर होस्टेस होती आता तीच लग्न हि झालाय. दोघीचा चेहरा अगदी मिळताजुळता आहे.

६. अभिनेत्री पूजा सावंत आणि रुचिरा सावंत

पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये कार्यरत असणाऱ्या पूजाने २०१० सालच्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.अभिनेत्री पूजा सावंत आणि रुचिरा सावंत या दोघी बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *