“अगंबाई सासूबाई” मालिकेबद्दल एका सामान्य गृहिणीने लिहलेला हा सुंदर लेख.. एकदा नक्की वाचाच

नमस्कार मी अरुणा गायकवाड मागील वेळेस मी लिहलेल्या लेखाला तुम्ही भरभरून दाद दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगलं लिहावंसं वाटतंय. मग म्हटलं सध्या सुरु असलेल्या “अगंबाई सासूबाई” मालिकेबद्दल लिहावं. लिहायचं कारणही तसेच आहे, एक सुखद आणि आनंद घरातील छोटछोट्या गोष्टींत सुख शोधणाऱ्या ह्या सासूबाई आणि त्यांचा संसार पहिला कि हि वाटतं सर्वानाच अशी सासू मिळावी जी सर्वाना सांभाळून घेईल आणि घरच्यांच्या आनंदाचा कायम विचार करत राहील.

मला सर्वात आवडीचा आणि कदाचित तुम्हालाही खूप आवडलेल्या सीन कडे येते. इथे आजोबा घरातून रागावून बागेत जाऊन बसतात अगदी उपाशी असल्याने कारखानीस काकांनी आणलेली भेळ ते नको नको म्हणून ज्या प्रकारे हात पुढे करत होते ते खूप छान दाखवलं. त्यानंतर निवेदिता सराफ म्हणजे सासूबाई आपल्या सासर्यांना किती सुंदर पद्धतीने समजावतात आणि त्या किती काळजीपूर्वक हाताला धरून त्यांना घेऊन जातात हा सीन खरंच पाहण्याजोगा होता. खरंच सासर्यांना सांभाळणं इतकं सोपं असत हे ह्यातून दिसत. अगदी छोट्या छोट्या गोष्ठी आपण दुर्लक्षित करता आणि उगाचच त्यांचा राग ओढवून घेतो. हि अशी कला सर्वच गृहिणींनी आत्मसात करायला हवी. आपली माणसं आपणच सांभाळायला हवी.

आशुतोष पत्की म्हणजेच मालिकेतील सोहमने ठीकठाक अभिनय केलाय. पण त्याने ह्यापूर्वी केलेल्या मालिकात तो जास्त उठून दिसायचा. त्याचा येणार चित्रपट once more ह्या चित्रपटाचा मी ट्रेलर पाहिला. काय सुंदर अभिनय आणि त्याला सूट होणारा लूक ह्यामुळे चित्रपट चांगला गाजेल ह्यात शंका नाही. मालिकेत त्याचा अभिनय थोडा कमीच आहे पण त्याला साजेसा अभिनय त्याने केलाय असे म्हणायला हरकत नाही.

मालिकेत एक खटकणारी गोष्ट नक्कीच नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे तेजश्री प्रधान म्हणजेच शुभ्रा हीच वागणं. तेजश्री प्रधान हिने ह्या पूर्वी अनेक मालिका केल्या पण त्यात ती किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे हे दिसून यायचं. ह्या मालिकेत ते भरभरून वाहताना दिसत. मालिकेत तिला सर्व काही समजत असं जरी दाखवण्यात आलं असलं तरी ती त्यापेक्षा जास्तीतच अभिनय करून हावभाव प्रकट करताना दिसते. खऱ्या आयुष्यात हि तू स्वतःला खूप हुशारच समजत असेल असंच वाटत.

गिरीश ओक यांचा अभिनय तर लाजवाबच असतो. अनेक रंगभीमीवरील त्यांची नाटके मी पाहिलीत उत्तम कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहेच. मालिकेतही त्यांनी खूपच छान काम केलय यात काडीमात्र शंका नाही. मालिकेचं सांगायचं झालं तर मालिका अगदी सुरेख आहे. सर्व कलाकार खूप छान अभिनय करतात. मुळात महिला पाहताना मजा येते. एक सुखी कुटुंब पाहायला कोणाला नाही आवडणार. दरवेळी घरातील भांडण आणि एकमेकांवर सूड उगारण ह्यापेक्षा अश्या आनंददायी मालिका झी ने अजून बनवाव्यात हीच आशा. टुकार मालिका पाहण्यापेक्षा मनाला आनंद मिळावा आणि त्यातून आपण जीवनात कास चांगलं वागलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला कसं सांभाळायला पाहिजे हे ह्यातून शिकायला मिळत. झी वाहिनेचे खरंच मनापासून आभार..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *