अखेर वयाच्या ५५व्या वर्षी ‘जो जिता वो ही सिकंदर ‘ चित्रपट फेम मामीक सिंग करणार ह्या प्रोड्युसरशी लग्न

बॉलिवूड चित्रपट ‘ जो जिता वोही सिकंदर ‘ एके काळी सुपरहिट चित्रपट ठरला. आमिर खान , आयेशा जुलका, पूजा बेदी, दीपक तिजोरी यांसोबतच मामीक सिंगही भाव खाऊन गेला. मामीकने या चित्रपटात आमिर खानच्या मोठ्या भावाची’ रतन ‘ची भूमिका बजावली होती. ही त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावुक करून गेली.

३ मे १९६३ साली मुंबई या ठिकाणी त्याचा जन्म झाला. जो जिता…चित्रपटा नंतर त्याने आर या पार,दिल के झरोको में या चित्रपटात काम केले. त्याने प्रीती झिंटाच्या ‘क्या केहना ‘ चित्रपटात तिच्या मोठया भावाची भूमिका साकारली. या चित्रपटात सैफ अली खान अनुपम खेर अशी बरीच स्टार कास्ट होती.

Bollywood actors Aamir Khan and Mamik Singh

चित्रपटात काम करत असताना त्याने टीव्ही मालिकेतही महत्वाच्या भूमिका साकारल्या . १९९५ सालच्या ‘चंद्रकांता’ मालिकेत त्याने देवाची भूमिका पार पाडली . युग मालिकेत त्याने अर्जुन सिंग तर दिवार मध्ये देखील त्याने अर्जुन साकारला. ‘शकालका बूम बुम’ या लहानग्यांच्या आवडत्या मालिकेतही तो झळकला.

‘विक्राल और गब्राल ‘ ही त्याची मालिकाही विशेष गाजली. ‘ चांद्रमुखी ‘ या मालिकेत त्याने कुंवर सुर्यप्रताप सिंह उत्तम साकारला. शूsss….फिर कोई है , मल्लिका सारख्या भयपट मालिकेत तो दिसला.


होळीच्या दिवशी (2march 2018)मामीक आणि प्रोड्युसर मीनाक्षी सागर यांची एंगेजमेंट झाली. त्याचे व्हिडीओ देखील तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. मीनाक्षी सागर ही ‘जमाई राजा ‘ चित्रपटाची प्रोड्युसर आहे. प्रसिद्ध रामानंद सागर यांची ती नात आहे. मिनाक्षीला साक्षी नावाची २० वर्षाची मुलगी आहे. साक्षी एक गायिका ,रायटर आहे. बोल्ड फोटोशूटमुळे साक्षी नेहमी चर्चेत राहिली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *