अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराज पाणी फौंडेशनला केली २५ लाखांची मदत

बॉलीवूडमधील खिलाडी अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार याने २५ एप्रिल २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पाणी फौंडेशन, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी तब्बल २५,००,००० ची मदत केल्याचे वृत्त आहे. याआधीही गेल्याच महिन्यात त्याने हुतात्म्याच्या नातेवाईकांना १ कोटी ८ लाख रुपयांची मदत केल्याचे वृत्त होते. सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये १२ जवान हुतात्मा झाले. अक्षय कुमारने प्रत्येक कुटुंबाला ९ लाखांची मदत केली आहे असे त्यांनी म्हटले. अक्षय कुमारने एकूण १ कोटी ८ लाख रुपयांची मदत केल्याचे बोलले जात आहे.

‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचे समर्थन केले आहे. उघड्यावर शौचाला बसल्यावर आजारपण पसरते त्यामुळे प्रत्येकानी शौचालयाचा वापर करावा याची तो सतत जनजागृती करत असतो. तसेच महिला दिनाच्या दिवशी स्वसंरक्षण कसे करायचे याचा एक व्हिडिओ अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता.

अक्षयची पत्नी ट्वीनकल नेही नुकताच ‘रुस्तम’ चित्रपटातील पोशाख लिलाव करणार असल्याचे म्हटले आहे. त्या पोषाखाची किंमत (बोली) हि तब्बल ५ कोटी रुपयांपासून सुरु होणार आहे. तसेच ह्यात मिळालेली रक्कम अक्षय भारतीय जावांसाठी खर्च करणार असल्याचेही बोलले जात आहे. अक्षय कुमारनेही याला दुजोरा देत हे वृत्त आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. त्यामुळे हा पोशाख कितीला विकला जाणार याची उत्सुकता लागून आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ (पाणी फौंडेशन) साठी आमिर खान महाराष्ट्र सरकारला खूप मोठी मदत करत आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना होणार आहे. पाणी फौंडेशन हे श्रमदानाने सुरु करण्यात आलेला भारतातील पहिला प्रयत आहे. त्यांच्या मते २०२० सालापर्यंत ८५% महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे. त्यामुळे सर्वानी ह्यात सहभाग घ्यावा आणि आपलं गाव दुष्काळमुक्त करावं असं आवाहन आमिर खान झी वाहिनीच्या माध्यमातून करत आहे. झी वाहिनी आणि आमिर खान यांच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्र आणि सर्व मराठी बांधव त्यांचे कायम ऋणी असू, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *