अंकुश चौधरी यांची पत्नी आहे हि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

अंकुश चौधरी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत अभिनेते आहेत. मराठी सोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. जिस देश मे गंगा रहता है या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनेते गोविंदा यांच्या समवेत महत्वाची भूमिका साकारली आहे. यासोबतच यंदा कर्तव्य आहे, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको इत्यादी मराठी चित्रपटांद्वारे प्रमुख भूमिका साकारली आहे.

अंकुश चौधरी यांचा जन्म ३१ जानेवारी १९७३ रोजी मुंबई येथे झाला. महर्षी दयानंद कॉलेज मधून शिक्षण घेतलं. पुढे डी. जी. रुपारेल कॉलेज मुंबई येथून अभिनयाचे धडे घेतले. महाराष्ट्राची लोकधारा या केदार शिंदे यांच्या व्यावसायिक नाटकापासून मराठी रंगभूमीत पदार्पण केलं. ‘बेधुंद मनाची लहर’ आणि पुढे केदार शिंदे यांच्याच ‘हसा चकट फु’ ह्या झी मराठी वरील कार्यक्रमात काम करायची संधी मिळाली.

अंकुश चौधरी आणि दीपा परब हे दोघे महर्षी दयानंद कॉलेज मध्ये असताना दोघांचं प्रेम जुळलं आणि पुढे दोघांनी लग्न हि केलं. ‘बेधुंद मनाची लहर’ या मराठी मालिकेत दोघांनी एकत्र कामही केलं आहे. दीपा परब यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९८१ साली मुंबईत झाला. तिनेही अंकुशच्या पावलावर पाऊल ठेऊन मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठवला. पण ती अंकुश चौधरी इतकी यशस्वी ठरली नाही.

दीपा परब ही १९९५ सालापासून मराठी रंगभूमीत कार्यरत आहेत. केदार शिंदे यांनी तिला ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘ऑल द बेस्ट’ या मराठी व्यावसायिक नाटकांत काम करण्याची संधी दिली. पुढे तिने ‘चकवा’ ‘मराठा बटालियन’ ‘कथा तिच्या लग्नाची’ ‘क्षण’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले.

नुकताच तिने केलेला ‘अंड्याचा फंडा’ चित्रपटही खूप गाजला. अंकुश चौधरी आणि दीपा परब यांना एक मुलगा आहे त्याच नाव ‘प्रिन्स परब’. अंकुश चौधरी आणि दीपा परब या दोघांचंही फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे. अंकुश चौधरी आणि दीपा परब आणि मुलगा प्रिन्स ह्या तिघांचे आणखी एकत्र फोटो तुम्हाला तिथे पाहायला मिळतील.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *